Fat Free Surgery : माहितीये फॅट फ्री सर्जरी असते तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 15:34 IST2022-05-19T15:27:46+5:302022-05-19T15:34:03+5:30
याच प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे एका कन्नड अभिनेत्रीला जीव गमवावा लागला

Fat Free Surgery : माहितीये फॅट फ्री सर्जरी असते तरी काय?
Fat Free Surgery: थूलत्व नाकारण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. त्यासाठी व्यायाम, आहारावरील निर्बंध वगैरे प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही स्थूलत्व जात नसेल तर शस्त्रक्रिया करून घेण्याला प्राधान्य दिले जाते. याच प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे एका कन्नड अभिनेत्रीला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर ही फॅट फ्री शस्त्रक्रिया असते तरी काय, हे जाणून घेणे योग्य ठरेल.
काय असते शस्त्रक्रिया?
- फॅट फ्री शस्त्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत लिपोसक्शन असे संबोधले जाते.
- या शस्त्रक्रियेद्वारे शरीरातील विशिष्ट अवयवांमधील मेद हटवला जातो.
- साधारणत: ओटीपोट, नितंब, मांड्या, दंड किंवा गळा या अवयवांमध्ये मेद साचलेला असतो. लिपोसक्शनमध्ये हाच मेद शरीरातून बाहेर काढला जातो.
... तरीही मेद न गेल्यास
स्थूलत्व कमी व्हावे यासाठी व्यायाम किंवा आहार नियंत्रण केले जाते. या उपायांनंतरही शरीरातील मेद कमी न झाल्यास लिपोसक्शन ही शस्त्रक्रिया केली जाते.
शस्त्रक्रियेनंतर...
- लिपोसक्शन शस्त्रक्रियेत संबंधित अवयवांमधून मेद वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पेशी काढून टाकल्या जातात.
- एकदा या पेशी काढल्या गेल्या की त्या पुन्हा वाढत नाहीत, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा आहे.
- शस्त्रक्रियेनंतर शरीरावर व्रण राहू शकतात परंतु ते काही काळानंतर लुप्त होतात.
किती खर्च येतो?
लिपोसक्शन शस्त्रक्रियेसाठी साधारणत: ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो.