2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक लोकांना होऊ शकतो डोळ्यांचा हा गंभीर आजार, जाणून घ्या धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 02:58 PM2024-05-13T14:58:32+5:302024-05-13T14:59:30+5:30

Eye Health : एक्सपर्ट म्हणाले की, ज्यापद्धतीने आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल होत आहेत त्यानुसार 2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त लोकांना 'एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन' चा धोका होऊ शकतो.

Expert says by 2040 age related macular degeneration may affect 300 million people worldwide | 2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक लोकांना होऊ शकतो डोळ्यांचा हा गंभीर आजार, जाणून घ्या धोका!

2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक लोकांना होऊ शकतो डोळ्यांचा हा गंभीर आजार, जाणून घ्या धोका!

Eye Health : शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे डोळे. जर डोळेच नसतील हे विश्व आपल्या बघता येणार नाही. पण गेल्या काही वर्षात डोळ्यासंबंधी समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. लहान मुलेही डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. कमी वयातच त्यांना चष्मा लागत आहे आणि वय वाढत त्यांनी कमी दिसत आहे. तर अनेकांना मोतिबिंदूची समस्या होत आहे.

डोळ्यांसंबंधी आजारांच्या धोक्याबाबत नुकताच एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यात एक्सपर्टनी चिंता व्यक्त केली आहे. एक्सपर्ट म्हणाले की, ज्यापद्धतीने आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल होत आहेत त्यानुसार 2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त लोकांना 'एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन' चा धोका होऊ शकतो.

सध्या जगभरात 20 कोटींपेक्षा जास्त लोक या समस्येचे शिकार आहेत. एज एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशनला वय वाढण्यासोबत कमी दिसणे किंवा डोळ्यांसंबंधी गंभीर आजारांचं मुख्य कारण मानलं जातं.

काय आहे एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन?

एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन (एएमडी) 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दृष्टी खराब होण्याचं मुख्य कारण आहे. असं तेव्हा होतं जेव्हा तुमच्या रेटिनाचा मुख्य भाग खराब होतो. रेटिना तुमच्या डोळ्यांमागे प्रकाश केंद्रित करणाऱ्या कोशिकांना म्हटलं जातं. हा आजार वाढत्या वयासोबत होतो, त्यामुळे याला एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन म्हटलं जातं. यामुळे दृष्टी जात नाही, पण दृष्टीसंबंधी गंभीर समस्या नक्की होतात.

काय सांगतात एक्सपर्ट?

डोळ्यांचे एक्सपर्ट मार्को एलेजांद्रो गोंजालेज म्हणाले की, एएमडीच्या समस्येचे अनेक कारणे असतात. ही समस्या तुम्हाला प्रभावित करेल किंवा नाही हे जास्तकरून वय आणि अनुवांशिकतेवर ठरतं. डोळ्यांच्या संबंधित या आजाराची लक्षण आणि कारणांना समजून घेण व कमी वयात या विकाराला रोखणं फार गरजेचं आहे.

एक्सपर्ट याबाबत निश्चित नाही की, काही लोकांमध्ये एएमडी का विकसित होतो? आणि इतरांमध्ये का नाही होत? काही रिसर्चमध्ये आढळून आलं की, तुमचे जीन आणि वातावरणाच्या काही स्थिती याच्या विकासाचं कारण असू शकतात.

कुणाला असतो जास्त धोका? 

टीमने सांगितलं की, एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशनचा धोका काही लोकांना अधिक असतो. एक्सपर्टनी सांगितलं की, धूम्रपान करणारे, हाय ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असणारे, जास्त फॅटचे पदार्थ खाणारे, लठ्ठपणासारख्या समस्या हा आजार वाढवू शकतात. हेही लक्षात घेतलं पाहिजे की, एएमडी आजारावर कोणताही उपाय नाही. याची लक्षणं कमी करण्यासाठी काही उपाय मदत घेतली जाऊ शकते.

कसा कराल बचाव?

कमी वयातच चांगल्या सवयी लावल्या तर भविष्यात होणाऱ्या डोळ्यांसंबंधी समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो. ज्या लोकांना जीनसंबंधी विकार आहे त्यांच्यात याला रोखलं जाऊ शकत नाही. एक्सपर्ट म्हणाले की, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते बंद करावं. हाय बीपीची काळजी घ्यावी. वजन कंट्रोलमध्ये ठेवा आणि नियमितपणे व्यायाम करा. तसेच आहारात फळं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

Web Title: Expert says by 2040 age related macular degeneration may affect 300 million people worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.