शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

फिटनेसच्या नावाखाली शरीराला जास्त त्रास दिला, तर येऊ शकतं नपुंसकत्व, किडनीही होऊ शकते फेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:44 PM

बघा, ही सात लक्षणं तुमच्यात दिसतात का ते?..

ठळक मुद्देअति व्यायामाचा शरीर आणि मनावरही मोठा ताण पडतो. रिलॅक्स होण्यासाठी आणि झालेली झीज भरून येण्यासाठी पुरेसा वेळच न मिळाल्याने तुमच्या शरीरासाठी ते हानीकारक ठरतं.अति व्यायाम करणाºयांना अनेकदा डीहायड्रेशनची समस्या जाणवते.गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने सांध्यांवर ताण येतो आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.

- मयूर पठाडेव्यायाम अनेक जण करतात, पण कोणता व्यायाम सर्वसामान्य आहे आणि कोणता ‘अति’ हे कसं ओळखायचं. कारण त्यासाठी काही सर्वसाधारण नियम नाही. वय, लिंग, तुमची शारीरिक क्षमता, तुमची आवड आणि तुम्ही पूर्वीपासूनच कसलेले व्यायामपटू आहात कि नवशिके, नव्यानंच व्यायामाकडे वळलेले.. या साºया गोष्टींवर तुमची व्यायामाची लेवल ठरते आणि कोणता, किती व्यायाम तुम्हाला योग्य, हे देखील या साºया गोष्टींवरुनच कळतं.पण व्यायामाबाबत तुम्ही कसलेले असा किंवा नवीन, काही लक्षणं मात्र सर्वांमध्ये थोड्याफार फरकानं सारखी असू शकतात आणि तुम्हाला ती कळतातही.तुमच्या जवळच्या लोकांना तर ही लक्षणं लक्षात येतातच, पण तुम्हीही फिटनेस फ्रिक असाल, तर आपण ‘अति’ करत आहोत की नाही, हे तुमचं तुम्हालाही कळू शकतं.खाली दिलेली सर्वसाधारण लक्षणं जर तुमच्यात दिसत असतील, तर नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे आणि आपण त्याकडे तातडीनं, गांभिर्यानं लक्ष दिलं पाहिजे हे लक्षात घ्या.काय आहेत ही लक्षणं?१- तुमच्या क्षमतेपेक्षा जर तुम्ही अधिक व्यायाम करीत असाल, तर तुमची चयापचय क्रिया सुधारण्यापेक्षा ती बिघडेतच.२- तुम्ही महिला असा, वा पुरुष, अति व्यायामामुळे तुमच्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर म्हणजे जननक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो.३- अति व्यायामाचा शरीर आणि मनावरही मोठा ताण पडतो. रिलॅक्स होण्यासाठी आणि झालेली झीज भरून येण्यासाठी पुरेसा वेळच न मिळाल्याने तुमच्या शरीरासाठी अंतिमत: ते हानीकारकच ठरतं.४- अति व्यायाम करणाºयांना अनेकदा डीहायड्रेशनची समस्या जाणवते. शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.५- गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्याने तुमच्या सांध्यांवरही ताण येतो आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.६- हृदयावर अति व्यायामाचा ताण येतो आणि हृदयाच्या समस्या सुरू होऊ शकतात.७- आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जर त्रास तुम्ही शरीर-मनाला देत असाल, तर किडनी डॅमेजची समस्याही उद्भवू शकते.