Endless scrolling Habit : फोन हाती घ्यायचा आणि सोशल मीडियावरील शॉर्ट व्हिडीओ एकापाठी एक स्क्रोल करत बघत रहायचं. ही अनेकांना जडलेली सवय आहे. एक एक व्हिडीओ करत कितीतरी बघितले जातात आणि कितीतरी तास यात निघून जातात. सगळं बघून झालं की, असा विचार केला जातो की, आज बराच वेळ यात वाया गेला. दुसऱ्या दिवशी परत तेच केलं जातं. अर्थात वेळ तर वाया जातोच, कामेही रखडतात. पण या सवयीचा आपल्या मेंदूवर काय प्रभाव पडतो, याचा कधी विचार केलाय का? याचा मेंदूवर इतका वाईट प्रभाव पडतो, ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. तेच समजून घेऊया.
सतत स्क्रोलिंगची सवय
कमी वेळेत जास्त माहिती देता यावी या पद्धतीनेच शॉर्ट व्हिडीओ बनवले जातात. यात फास्ट जंप कट्स आणि अचानक लक्ष वेधून घेणाऱ्या क्लीप्स वापरल्या जातात. ज्यामुळे आपण ते सतत बघत राहतो. यात सुरूवातीला तर काही वाटत नाही, पण जर ही सवय जास्त काळ राहिली तर याने मेंदूचं काम प्रभावित होतं. Frontiers in Human Neuroscience च्या एका रिपोर्टनुसार, ज्या लोकांना शॉर्ट प्हिडीओ बघण्याची सवय असते, त्यांच्यात स्वत:वर कंट्रोल आणि फोकस करण्याची क्षमता कमजोर होते.
संशोधकांनी एक संशोधन केलं, ज्यात त्यांनी काही लोकांचं EEG स्कॅन केलं. त्यावेळी ते फोकस करावं लागतं असं काम करत होते. संशोधकांना आढळून आलं की, जे लोक जास्त स्क्रोलिंग कन्टेन्ट बघतात, त्यांचा मेंदू इतरांच्या तुलनेत फार कमी फोकस करू शकत होता.
कशी लागते शॉर्ट व्हिडिओची सवय?
शॉर्ट व्हिडीओ बघण्याची सवय हळूहळू लागते. कारण यात फार कमी वेळेत नवीन आणि मजेदार कन्टेन्ट बघायला मिळतो. जेव्हा आपण एखादा व्हिडीओ बघतो तेव्हा त्यातील कन्टेन्ट पाहून एखादी भावनात्मक प्रतिक्रिया जाणवते, ज्यामुळे पुढे आणखी व्हिडीओ बघण्याची इच्छा होते. अशात आपल्या मेंदूला छोटा आणि फास्ट कन्टेन्ट बघण्याची सवय लागते. त्यानंतर मोठे व्हिडीओ बघण्याची आणि समजण्याची इच्छा कमी होऊ लागते. हळूहळू आपण शॉर्ट व्हिडिओच्या जाळ्यात अडकतो.
फक्त फोकस करण्याचा मुद्दा नाही
सतत फोन स्क्रोल करत व्हिडीओ बघण्याच्या सवयीने मेंदू पूर्ण काम करण्याची प्रक्रिया प्रभावित होते. सतत छोटे आणि फास्ट व्हिडीओ बघण्याच्या सवयीने मेंदूला लगेच मिळणाऱ्या आनंदाची सवय लागते. हळूहळू विचार करण्याची, समजण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होऊ लागते. कारण मेंदू खोलवर विचार करण्याऐवजी लवकर लवकर बदलत्या कन्टेन्टच्या हिशोबाने वागू लागतो.
Web Summary : Endless short video scrolling harms focus and decision-making. The brain gets used to instant gratification, impacting cognitive functions. This habit weakens concentration and in-depth thinking.
Web Summary : लगातार शॉर्ट वीडियो स्क्रॉलिंग फोकस और निर्णय लेने की क्षमता को नुकसान पहुंचाती है। दिमाग को तुरंत संतुष्टि की आदत हो जाती है, जिससे संज्ञानात्मक कार्य प्रभावित होते हैं। यह आदत एकाग्रता और गहराई से सोचने की क्षमता को कमजोर करती है।