कॅन्सर म्हणजेच कर्करोगाबाबत पूर्वी फारच कमी ऐकायला मिळत होतं, पण आता हा जीवघेणा आजार जगभरात एक कॉमन आजार म्हणून डोकं वर काढत आहे. महिलांमध्ये होणारा सर्वात होणारा ब्रेस्ट कॅन्सर आहे. भारतात साधारण २५ ते ३२ टक्के शहरी महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. अशात आजाराची लागण झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे कधीही चांगले. ब्रेस्ट कॅन्सरवर असाच एक उपाय म्हणजे दही असल्याचा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, दही खाल्ल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
कसा होता दह्याचा फायदा?
या नव्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, दही जर दररोज सेवन केलं तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका बराच कमी केला जाऊ शकतो. अभ्यासकांनुसार, ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा एक सर्वात मोठं कारण म्हणजे घातक बॅक्टेरियामुळे ब्रेस्टमध्ये होणारं इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आणि जळजळ आहे. अशात दह्यातील गुड बॅक्टेरिया शरीरातील नुकसानकारक बॅक्टेरिया दूर करण्यात मदत करतं.
आईच्या दुधातील गुड बॅक्टेरियासारखेच दह्यातील बॅक्टेरिया
असं असलं तरी अभ्यासकांचा हा दावा अजून पूर्णपणे सिद्ध होऊ शकलेले नाही. पण हा दावा त्या पुराव्यांवर आधारित आहे की, ब्रेस्टमध्ये बॅक्टेरियामुळे येणाऱ्या सूजेचा संबंध कॅन्सरसोबत असतो. दह्यात लॅक्टोज फर्मेन्टिग बॅक्टेरिया आढळतात. जे दुधातही असतात आणि फायदेशीर असतात. हेच बॅक्टेरिया ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांच्या ब्रेस्टमध्येही आढळतात.
गुड बॅक्टेरिया कसे वाढतील?
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, दह्याचं नियमित सेवन केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो आणि अभ्यासकांनुसार याचं कारण नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या दह्यात आढळणारे चांगले आणि फायदेशीर बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया नुकसानकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तसेच खाण्यात प्रोबायॉटिक्सचं प्रमाण वाढवल्याने ब्रेस्टमध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात, ज्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.
का वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, मनुष्याच्या शरीरात साधारण १० अब्ज बॅक्टेरिअल सेल्स असतात, ज्यातील जास्तीत जास्त बॅक्टेरिया आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवत नाहीत. पण यातील काही बॅक्टेरिया कधी कधी शरीरात टॉक्सिन्स तयार करू लागतात. ज्यामुळे शरीरात सूज आणि जळजळ होते. जर हे इन्फ्लेमेशन जास्त काळ शरीरात राहिलं तर त्याला क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणतात. याने शरीराचं नुकसान होऊ लागतं.
इतरही काही फायदेशीर पदार्थ
दह्यासोबत इतरही काही पदार्थ आहेत ज्यांनी कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, असा दावा केला जातो. त्यातील पहिला म्हणजे हळद. करक्यूमिन असलेली हळद कॅन्सर सेल्स वाढू आणि तयार होऊ देत नाही. खासकरून ब्रेस्ट, लंग्स आणि स्कीन कॅन्सरपासून बचावासाठी हळद फायदेशीर ठरू शकते. तसेच वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, टोमॅटोमध्ये लायकोपीन आढळतं. हे लायकोपीन वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर रोखण्यास फायदेशीर ठरतं. त्यासोबतच लसणाने कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या तत्वांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. लसणामधील सल्फर आणि फ्लेवोनॉल्स कॅन्सरपासून बचावासाठी फायदेशीर मानलं जातं.
(टिप : या लेखातील उपाय हे केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. रिसर्चमधील माहिती किंवा उपायांचा कुणाच्या सल्ल्याशिवाय वापर करू नका. कारण याने नुकसान होण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रिसर्चमधील दावा हा आमचा दावा नाही. ती केवळ माहिती आम्ही देत आहोत.)