भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:34 PM2020-12-18T12:34:21+5:302020-12-18T12:45:38+5:30

Health Tips in Marathi : मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला याची कारणं सांगणार आहोत. 

Eating potato and rice by heating second time is harmful know the reasons | भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

googlenewsNext

 

अनेकदा घरी रात्रीचं किंवा दुपारचं जेवण उरलं असेल तर आपण ते अन्न गरम करून पुन्हा खातो. अन्न वाया जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटतं असते. याशिवाय  काही उरलेलं असेल तर जास्तीचे बनवावे लागत नाही. यासाठी उरलेले अन्न मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. खासकरून चपाती, भात असे पदार्थ गरम करून वारंवार खाल्ले  जातात. माय उपचारशी बोलताना आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यपदार्थही मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला याची कारणं सांगणार आहोत. 

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम केल्यानं धोका वाढतो? 

मायक्रोवेव्हमध्ये गरम करून भात खाण्याने फूड पॉईजनिंग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बॅसिलस सेरियस नावाचे जिवाणू भातामध्ये निर्माण होऊ लागतात. हे जीवाणू गरम झाल्यामुळे नष्ट होतात, परंतु यामुळे बीजाणू तयार होतात, जे विषारी असू शकतात.

तज्ज्ञांच्या मते एकदा भात मायक्रोवेव्हमध्ये गरम करून सामान्य तपमानावर बाहेर ठेवला गेला, तर त्यात उपस्थित  अन्नातून फूड पॉईजनिंग होण्याचा धोका वाढवू शकतात. म्हणून, मायक्रोवेव्हमध्ये भात गरम करून खाऊ नये.  त्यापेक्षा ताजा शिजवून ठेवलेला भात खाणं जास्त फायदेशीर ठरेल. मातीच्या भांड्यात शिजवलेला भात खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्याने शरीरात जास्त कर्बोदक जात नाही.

शिजलेला बटाटा पुन्हा गरम केल्यावर त्यातील जीवाणू गरम झाल्यावरही मरत नाहीत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बटाट्यात आढळणारे जीवनसत्व बी 6, पोटॅशियम आणि जीवनसत्व सी शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु बटाटा गरम केल्यामुळे त्यातील हे आवश्यक घटक नष्ट होतात. याशिवाय बटाटा वारंवार गरम केल्याने हे बोटुलिनम तयार करू शकते, जे जीवाणूंना प्रोत्साहन देते. अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये बटाटे गरम करून खाणे अधिक हानिकारक असते.

रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

चिकन पुन्हा मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यानं आरोग्याला उद्भवणारा धोका वाढतो. शिजवलेल्या कोंबडीचे मटण पुन्हा-पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषक द्रव्य निघून जातात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या सुरू होते. याशिवाय त्यामुळे गॅस, पित्त,  पोट साफ न होणं इत्यादी समस्या उद्भवू शकतात. हिरव्या पालेभाज्यांना पुन्हा गरम केल्यावर त्यातील नायट्रेट घटक नष्ट होतो.

अरे व्वा! अंगठीद्वारे कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येणार; शास्त्रज्ञांचा दावा

हिरव्या पालेभाज्या वारंवार गरम केल्याने प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे त्वचेवर पुरळ आणि डाग येऊ शकतात. अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. अंडी पुन्हा गरम केल्यावर नायट्रोजनचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अंड्याची भाजी देखील पुन्हा गरम करू नका. यामुळे आरोग्याला नुकसान पोहोचतं.

Web Title: Eating potato and rice by heating second time is harmful know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.