आठवड्यात ३०० ग्रॅम चिकन खाल्ले तर होतोय पचनसंस्थेचा कॅन्सर, पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 07:23 IST2025-04-29T07:22:24+5:302025-04-29T07:23:14+5:30
या संशोधनाला काही मर्यादाही होत्या, यात प्रक्रिया केलेल्या चिकनच्या वापराबद्दल आणि अन्न शिजवण्याच्या पद्धतीची माहिती नव्हती.

आठवड्यात ३०० ग्रॅम चिकन खाल्ले तर होतोय पचनसंस्थेचा कॅन्सर, पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका
नवी दिल्ली : चिकन हे अनेक खाद्यप्रेमींसाठी लोकप्रिय आहे. मात्र आठवड्यात ३०० ग्रॅम चिकन खाल्ले तर पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगाचा (गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर) धोका वाढू शकतो असे एका नव्या संशोधनात समोर आले आहे. न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ३०० ग्रॅमपेक्षा जास्त पांढरे मांस (व्हाईट मांस) चे सेवन केल्यामुळे मृत्युदर आणि पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. विशेषतः पुरुषांमध्ये हा धोका महिलांपेक्षा जास्त असल्याचे संशोधकांना आढळले.
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
संशोधनाला काय मर्यादा आहेत?
या संशोधनाला काही मर्यादाही होत्या, यात प्रक्रिया केलेल्या चिकनच्या वापराबद्दल आणि अन्न शिजवण्याच्या पद्धतीची माहिती नव्हती. आहार प्रश्नावलीमध्ये फक्त मांसाच्या सेवनाची नोंद झाली होती. यात सहभागींच्या शारीरिक हालचालींचा विचार करण्यात आला नाही.
अभ्यासात काय आढळले, नेमका काय होतो परिणाम?
डायेटरी गाइडलाइन्स फॉर अमेरिकन २०२०-२५ च्या अहवालात चिकन, टर्की, बदक, हंस आणि गेम बार्ड यांचा समावेश आहे. यात आठवड्यात खाल्ले
जाणारे चिकन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अभ्यासात चिकन खाल्ल्यामुळे आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात ४,००० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. त्यांचे १९ वर्षे निरीक्षण करण्यात आले.
काय समोर आले?
अभ्यासात अनेक चिंताजनक बाबी समोर आल्या. दर आठवड्याला ३०० ग्रॅमपेक्षा जास्त मांस सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये १०० ग्रॅमपेक्षा कमी खाणाऱ्यांच्या तुलनेत मृत्युदर २७% जास्त असल्याचे दिसून आले.
दर आठवड्याला ३०० ग्रॅमपेक्षा जास्त मांस सेवन करणाऱ्या पुरुषांना पचनसंस्थेशी संबंधित कर्करोग होत मृत्युदराचा दुप्पट धोका होता.
दर आठवड्याला १०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन सेवन करणाऱ्यांसाठीही मृत्युदराचा संबंध अभ्यासात दर्शविण्यात आला.