शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ही पाच फळे खा, शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 20:24 IST

आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर होतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची योग्य पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश असावा ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. आपल्या आहारात लोह, कॉपर, जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिडचा समावेश करणे गरजेचे आहे. पोषक घटक रक्तात ऑक्सिजन वाढविण्यास मदत करतात. 

अननसअननसमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, थायमिन या सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. अननसात ब्रोमिलेन एन्झाइम असते. हे पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. अननस खाल्ल्याने आतडेही निरोगी राहतात. अननसामध्ये लोह असते जे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. तसेच लोहामुळे शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.

पपईपपई हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ए, बी व सी सारखी जीवनसत्त्वांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत होते. तसेच पपईमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कच्ची पपईचा उपयोग सलाड बनवण्यासाठी केला जातो. पपईच्या बियांचे खूप औषधी फायदे आहेत.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीरक्तात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास ब्लूबेरी फार मदत करते. यात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, सी असते. हे सर्व घटक शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमध्ये राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन यासह अनेक पौष्टिक घटक असतात. जे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करतात.

केळीकेळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात अल्काइन असते. तसेच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. केळी खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. केळ्यात पोटॅशियम, फॉलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळ्यात १०० कॅलरी उर्जा असते.

किवीकिवीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. म्हणून, सध्याच्या काळात डॉक्टर लोकांना किवी खाण्याचा सल्ला देत आहेत. किवीचा रस शरीरातील पचन क्रिया सुधारण्याचे काम करते. हे पोटा संबंधित समस्या दूर करते तसेच बद्धकोष्ठतेतून आराम मिळतो. आपण आपल्या आहारात याचा नियमित समावेश करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे