लिव्हरच्या आजारांचे रूग्ण आजकाल जगभरात खूप जास्त वाढत आहेत. त्यात भारतात लिव्हरच्या रूग्णांची संख्या जास्त आहे. सगळ्यात जास्त फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे. याकडे जर दुर्लक्ष केलं तर लिव्हर डॅमेज, सिरोसिस आणि कॅन्सरचा धोका वाढतो. फॅटी लिव्हरची समस्या जाणून घेण्यासाठी SGOT आणि SGPT टेस्ट केली जाते. या दोन्ही एंझाइमला लिव्हर कंट्रोल करतो. जर यांचं प्रमाण वाढलं असेल तर याचा अर्थ लिव्हर खराब होत आहे किंवा झालं आहे.
जेव्हा लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅट भरू लागतं तेव्हा फॅटी लिव्हर डिजीज होतो. अशात भारतात मिळणारं एक फळ यावर उपाय म्हणून फार फायदेशीर ठरू शकतं. पण हे फळ केवळ दोन महिनेच मिळतं. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह पांचाल नुसार या फळाचा सीझन केवळ 2 महिने असतो. या फळाला ताडगोळे किंवा आइस अॅप्पल म्हटलं जातं. हे फळ ताड्याच्या झाडावर लागतं.
लिव्हरसाठी फायदेशीर फळ
ताडगोळे हे लिव्हरसाठी फारच फायदेशीर मानले जातात. जर तुम्हाला फॅटी लिव्हर किंवा कोणता आजार तर तो बरा करण्यास हे फळ मदत करतं. या फळांमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं जे लिव्हरती सफाई करण्यास मदत करतं आणि फॅटी लिव्हरपासून बचाव करतं.
वाढतं वय कमी करणार
जर तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागले असाल तर तुमच्यासाठी ताडगोळे बेस्ट फळ आहे. ताडगोळ्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी इन्फ्लामेटरी तत्व असतात. जे फ्री रेडिकलसोबत लढून त्यांना नष्ट करतात. हेच कमी वयात जास्त वय दिसण्याचं मुख्य कारण आहेत.
थकवा होईल दूर
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे थकवा वाढतो. यापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाणी पिणं चांगलं आहे पण इलेक्ट्रोलाइटची कमतरता पूर्णपणे भरून काढू शकत नाहीत. तोडगोळ्यांमध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम योग्य प्रमाणात आहेत जे इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स बनवतात.
आतड्यांसाठी फायदेशीर
जर तुम्हाला पोटासंबंधी किंवा आतड्यांसंबंधी काही समस्या असेल तर हे फळ नक्की खावं. अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस इत्यादीसोबत लढण्यास हे फळ फायदेशीर ठरतं.