शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 10:26 IST

वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाढलेल्या वजनामुळे हैराण प्रत्येक व्यक्ती शोधत आहे. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं, तर कुणी वेगळी एखादी थेरपी करतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात.

वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाढलेल्या वजनामुळे हैराण प्रत्येक व्यक्ती शोधत आहे. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं, तर कुणी वेगळी एखादी थेरपी करतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण सगळ्यांना ते काही दिवसात कमी व्हावं असं वाटत असतं. काहींचं होतं तर काहींचं नाही.

वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वजन वाढण्याला व्यक्ती स्वत: जबाबदार असते. आणि वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजची गरज पडते. अशात आणखी एक उपाय आहे ज्याने तुम्ही सहजपणे वजन नियंत्रित ठेवू शकता. 

सोपा आणि चांगला उपाय

वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर मानसिक शांतता मिळवा. मानसिक शांतता मिळवून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. वेगवेगळे उपाय आधीच करून झाले असतील तर हा उपाय ट्राय करा. पण जर तुम्ही मानसिक रूपाने शांत राहणार नाही, तर तुम्ही वजन कमी करू शकणार नाहीत.

वजन वाढण्याची कारणे?

हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की, मानसिक शांतता मिळवून वजन कमी कसं केलं जाऊ शकतं? त्याआधी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, तणाव आणि सतत चिंता करणे या गोष्टी वजन वाढण्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे अर्थातच वजन कमी करण्यासाठी खूश राहणे गरजेचे आहे. तज्ज्ञ सांगतात की, आनंदी राहून व्यक्ती त्यांचं बरंचसं वजन कमी करू शकतात.

जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा नकारात्मक विचारांमधून तुम्ही जात असता. यामळे स्ट्रेस हॉर्मोन कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. आणि जेव्हा शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्हाला फार थकवा जाणवतो. त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करत नाहीत. सोबतच तुम्ही त्या पदार्थांकडे आकर्षित होता, ज्याने तुमचं वजन वाढतं.

आनंदी राहून वजन कमी कसं होतं?

(Image Credit : SafeBee)

वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी आनंदी राहणं फार गरजेचं असतं. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की, जेव्हा तुम्ही आनंदी होता, तेव्हा शरीरात डोपामाइन हार्मोनचं प्रमाण वाढतं. डोपामाइनमुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच आनंदी राहिल्याने तणाव कमी होतो. एका रिसर्चनुसार, तुम्ही आनंदी असता तेव्हा किमान १० कॅलरी बर्न करत असता.

आनंदी राहण्यासाठी काय करावं?

(Image Credit : legendfitness.com)

आता तुम्ही विचार करू लागले असाल की, आनंदी राहण्यासाठी काय करावं? तर सर्वातआधी तुमची लाइफस्टाईल नियमित करा. तसेच आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करा, तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा, आनंदी लोकांना भेटा, एक्सरसाइज करा इत्यादी. रोजच्या जगण्यात आनंदी राहण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधा. 

आहारातही करा बदल?

(Image Credit : Onlymyhealth)

तुम्ही आनंदी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्ही हेल्दी डाएटचाही आधार घेऊ शकता. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्यावे आणि हलक्या पदार्थांचं सेवन करावं. पुरेशी झोप घ्यावी. झोपण्याच्या दोन तासांपूर्वी डिजिटल वस्तूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर राहील.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स