रामदेव बाबांनी लॉन्च केलेले औषध कोरोनिल WHO सर्टिफाईड नाही; ट्विट करत केला खुलासा

By Manali.bagul | Published: February 21, 2021 05:38 PM2021-02-21T17:38:44+5:302021-02-21T18:04:36+5:30

Coronil launched by Ramdev Baba is not WHO certified : दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती. 

The drug Coronil launched by Ramdev Baba is not WHO certified Revealed by tweeting | रामदेव बाबांनी लॉन्च केलेले औषध कोरोनिल WHO सर्टिफाईड नाही; ट्विट करत केला खुलासा

रामदेव बाबांनी लॉन्च केलेले औषध कोरोनिल WHO सर्टिफाईड नाही; ट्विट करत केला खुलासा

googlenewsNext

(Image Credit- Business Standard) 

कोरोना व्हायरस पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे. बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी कोरोनावर रामबाण उपाय (Medicine for Coronavirus) शोधल्याचा दावा केला होता. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले होते.  दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती. 

दरम्यान (Coronil is not WHO certified) जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक उपचारांना परवानगी दिलेली नाही तसंच अशा उपचारांचा दावा करत असलेल्या कोणत्याही संस्थेला सर्टिफिकेट्ही दिलेलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की WHO च्या  सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO  दक्षिण पूर्व एशियाच्या रीजनल अधिकाऱ्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाच्या औषधाचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्टिफिकेशन करण्यात आलेले नाही. 

आचार्य बाळकृष्णांनी दिलं स्पष्टीकरण

कोरोनिल डब्ल्यूएचओ प्रमाणित नाही- जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिले आहे की त्यांनी कोणत्याही पारंपारिक औषधाच्या परिणामाचा आढावा घेतला नाही किंवा कोविड १९ च्या उपचारांना कोणतेही प्रमाणपत्र दिले नाही. आता डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले की डब्ल्यूएचओने कोविड -१९ च्या उपचारांसाठी कोणत्याही पारंपारिक औषधाचे प्रमाणपत्र दिले नाही.

रामदेव बाबा  यांनी अशी घोषणा केली होती की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर (COVID-19) उपचार होतील. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली. यावेळी कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

याआधीही रामदेव बाबांनी कोरोनाचे उपचार शोधण्याचा दावा केला होता. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते म्हणून बुस्टर असं या औषधाला म्हटलं होतं आता रामदेव बाबांनी कोरोनिलला  CoPP - WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे. पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील. कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

Web Title: The drug Coronil launched by Ramdev Baba is not WHO certified Revealed by tweeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.