शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 10:57 IST

Health Tips in Marathi : निरोगी आणि फिट राहण्यासाठी पाण्याचे सेवन कधी करायचं हे लक्षात घ्यायला हवं. 

(Image Credit- Allure)

जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची अनेकांची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं गंभीर आजार होण्याचा धोका असतो. म्हणून जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास थांबून मगच पाण्याचं सेवन करायला हवं. आज आम्ही तुम्हाला खाल्यानंतर  लगेच पाण्याचे सेवन का करू नये. याबाबत अधिक माहिती देणार आहोत. निरोगी आणि फिट राहण्यासाठी पाण्याचे सेवन कधी करायचं हे लक्षात घ्यायला हवं. 

पचनक्रिया कमकुवत होते

खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास पचनासंबंधित समस्यांचा धोका असतो. पाचन प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी, खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानेच पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढणं

अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या.

डायबिटीसच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरतं

जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अल्सर

जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्यानं अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आजारांपासून दूर  राहण्यास मदत होते. 

पाणी पिण्याची योग्य वेळ

सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

भारतात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे लसीकरण होणार; पाहा कोणाकोणाला लस मिळणार

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं. यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य