भारतात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे लसीकरण होणार; पाहा कोणाकोणाला लस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 09:36 AM2020-12-27T09:36:35+5:302020-12-27T10:16:48+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सध्या दिल्लीत लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६०० आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

1000 covid vaccine points to give shots to 51 lakh in phase 1 in delhi | भारतात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे लसीकरण होणार; पाहा कोणाकोणाला लस मिळणार

भारतात पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांचे लसीकरण होणार; पाहा कोणाकोणाला लस मिळणार

Next

राजधानी दिल्लीमध्ये  कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना दिली जाणार आहे. यासाठी जवळपास एक हजार लसीकरणाचे  केंद्र तयार केले जाणार आहेत. दिल्लीतील  ४८ सरकारी आणि १०० खासगी रुग्णालयात ही केंद्र तयार केली जातील. लसीकरण केंद्रावर  कोल्ड चेनची व्यवस्था असेल. यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील. सध्या दिल्लीत लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६०० आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शासकीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या खासगी रुग्णालयांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांना लसी दिली जाणार आहेत. अशा लोकांना प्राधिकरणाकडून एसएमएसद्वारे माहिती मिळेल, ज्यामध्ये बूथ आणि वेळेचा उल्लेख असेल. लसीकरण कार्यक्रम, कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कम्युनिटी मेडिसिनचे संचालक डॉ. सुनीला गर्ग यांनी सांगितले की, सर्व ५१ लाख लोकांचे लसीकरण मोफत केले जाईल. डॉ. गर्ग म्हणाले, "सर्व बूथवर लसींची तपासणी सरकारी अधिकारी करतील."

शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बांधली जातील. ही प्रक्रिया सकाळी  ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू होईल. ३ हजार कर्मचाऱ्यांसह लोकनायक रुग्णालयात कोल्ड चेन तयारी केली असून तेथे ५ लसीकरण केंद्रे असण्याची शक्यता आहे. काही मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही अनेक लसीकरण केंद्रे असतील.

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

सकाळी ९ ते संध्याकाळी ५ काळात प्रत्येक बूथवर सुमारे १०० लसींचे डोस दिले जातील. प्रत्येक बूथमध्ये ३ खोल्या असतील. यापैकी एकीकडे आधार कार्डसह इतर ओळखपत्रांवर आधारित पडताळणी असेल. दुसर्‍या क्रमांकावर लसीचे डोस दिले जातील  आणि लस दिल्यानंतर तिसऱ्या खोलीत सुमारे अर्धा तास ठेवले जाईल. २८ दिवस परिक्षण केल्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार

कोविड -१९ लसीकरणातील पहिल्या टप्प्यात ३ लाख आरोग्यसेवा कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन कामगार आणि ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या किंवा इतर कोणत्याही गंभीर आजार असलेल्या २ लाख लोकांना लसी दिली जाईल. एका अधिकाऱ्याने  दिलेल्या महितीनुसार ज्याला आपले नाव नोंदणी करून घेण्याची आवश्यकता असेल त्याने जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

Web Title: 1000 covid vaccine points to give shots to 51 lakh in phase 1 in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.