शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उपाशीपोेटी पाणी प्या आणि आरोग्यातला फरक स्वत: अनुभवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 21:30 IST

असं म्हणतात पाणी हे जीवन आहे. उन्हाळ्यात तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता खूप जाणवते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे बरेच फायदे होतात...

असं म्हणतात पाणी हे जीवन आहे. उन्हाळ्यात तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता खूप जाणवते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. आपल्या शरीरात सुमारे ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते.  

पायनॅकल केयर या वेबसाईटला डॉ. आशिष सचदेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे बरेच फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. तसेच शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहरा चमकदार होतो. अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. यावर पाणी पिणं हा चांगला उपाय आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. जर तुम्ही शरीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या.

यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये देखील सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजनही नक्कीच कमी होण्यास मदत होईल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे पचनक्रियी तर सुधारेलच पण वजनही कमी होते. तसेच त्वचेची समस्याही दूर होते. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्ताभिसरण चांगले होते. नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे. शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी