शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

रात्री झोपण्याआधी प्या 'हे' खास डिटॉक्स ड्रिंक, शरीर आतून होईल साफ; वजनही होईल कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 10:24 IST

Weight Loss Drink : तुमचंही वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर एक असं डिटॉक्ट ड्रिंक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Weight Loss Drink : आजकाल अनेक लोकांना वजन वाढण्याची समस्या होत आहे. याला कारण चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल आहे. जर आहारावर वेळीच लक्ष दिलं नाही तर वजन लगेच वाढतं. जे कमी करणं फारच अवघड होऊन बसतं. त्यामुळे वेळीच काहीतरी उपाय करायला हवेत.

तुमचंही वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर एक असं डिटॉक्ट ड्रिंक आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. डायटिशिअन मंजू मलिक यांनी या नाईट डिटॉक्स ड्रिंकबाबत इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.

वजन कमी करणारं डिटॉक्स ड्रिंक

डायटिशिअनुसार, हे डिटॉक्स ड्रिंक पिऊन तुमचं केवळ वजनच कमी होणार नाही तर मसल्स क्रॅप्सची समस्या दूर होईल आणि तुमची पचनासंबंधी समस्याही दूर होईल.

कसं बनवाल हे ड्रिंक

हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला पुदीन्याची पाने, बडीशेप आणि आपल्याची गरज पडेल. एक चमचा बडीशेपच्या दाण्यांमध्ये एक तुकडा आलं टाका आणि ते बारीक करा. एक कप पाणी कमी आसेवर गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात बडीशेफ आणि आल्याचं बारीक केलेलं मिश्रण टाका. हे काही वेळ उकडू द्या. गॅस बंद करून त्यात काही पुदीन्याची पाने टाका. हे पाणी कोमट झाल्यावर गाळून सेवन करू शकता. 

इतर काही फायदेशीर ड्रिंक्स

डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. असंच एक डिटॉक्स ड्रिंक म्हणजे मध आणि दालचीनी. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचीनी पावडर किंवा एक दालचीनीची एक काडी टाकून उकडला. हे पाणी एका कपमध्ये गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून याचं सेवन करा.

लिंबू आणि आल्याचं डिटॉक्स ड्रिंकही पिऊ शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एक कप पाण्यात आलं टाकून उकडा आणि नंतर हे गाळून त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाका. तुम्ही यात मधही टाकू शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य