शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पायाच्या 'या' समस्या जाणवल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 8:09 PM

काही शारीरीक समस्या सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून येत होत्या. मात्र आता बदलेल्या लाईफस्टाईलमुळे तरूणांमध्येही या समस्या दिसून येत आहेत.

डायबेटीसची समस्या सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त दिसून येत होती. मात्र आता बदलेल्या लाईफस्टाईलमुळे तरूणांमध्येही ही समस्या दिसून येते. जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा शरीरात डायबेटीजची लक्षणं दिसू लागतात. यापैकी काही लक्षणं ही पायांमध्येही दिसतात. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य.

डायबेटीजची पायांमध्ये दिसून येणारी लक्षणं पुढीलप्रमाणे-पायाला जखम होणंजर तुमच्या पायांवर आपोआप जखमा होत असतील किंवा एखादी छोटीशी जखम मोठी होत असेल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. ब्लड शुगरचं प्रमाण वाढलं की बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही. यामुळेच जखमा होण्याची शक्यता असते.

पाय सुन्न होणंजेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीराच्या नसांना कमकुवत होतात. त्यांची संवेदनाही कमी होते. परिणामी पाय सुन्न होण्याची समस्या आढळते.

पाय सुजणंपाय सुजणं हे डायबेटीजचं सामान्य लक्षणं मानलं जातं. सतत तुमच्या पायाला सूज येत असेल तर ती डायबेटीजची समस्या असल्याची शक्यता आहे. कारण रक्तात साखरेची मात्रा वाढल्यानंतर शरीरातील विविध भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते.

पायाच्या त्वचेची जळजळ होणंडायबेटीजमध्ये तुमच्या पायाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते. याचे कारण असे की, डायबेटीजमुळे होणारं यीस्ट इन्फेक्शन, कोरडी त्वचा या समस्या कारणीभूत असतात. यामुळे तळापायाची त्वचाही जास्त जळजळते. त्यामुळे जर पायांना अशी जळजळ जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. 

टॅग्स :Healthआरोग्य