शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा हा नवा ट्रेण्ड ठरू शकतो घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:13 IST

कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. 

सध्याच्या कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. कच्च्या भाज्या खाणे हा त्यातलीच एक नवा ट्रेंड. काही लोक वजन घटवण्यासाठी कच्च्या भाज्या खातात. कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. त्यात तथ्यही आहे. पण आयुर्वेदिक डॉक्टरांचे याबाबत वेगळेच म्हणने आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. 

कच्च्या भाज्या खाण्यासंदर्भात बंगळुरचेआयुर्वेद वैद्य डॉ. शरद कुलकर्णी M.S (Ayu),(Ph.D.)यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या उत्तम आरोग्यासाठी या गोष्टी आपण जरूर ऐकल्या पाहिजेत.

कच्च्या भाज्या खाण्याचे तोटे

  • डॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या भाज्यांवर अनेक प्रकारचे जीवाणू व विषाणू असण्याची शक्यता असते. अशा भाज्यांचे सेवन केल्यास हे जीवाणू, विषाणू शरीरात प्रवेश करतात. हे आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरु शकते. तसेच या भाज्यांवर धुळ, माती जमलेली असते. ती पोटात जाणे निश्चितच अपायकारक आहे.
  • कच्च्या भाज्या पचनासाठीही जड असतात. त्यामुळे पोटाशी संबधित अनेक आजार उद्भवू शकतात. शिजवलेल्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतं.

अशापद्धतीने खाऊ शकता कच्च्या भाज्याडॉ. शरद कुलकर्णी यांच्या मते कच्च्या भाज्या खाण्यापूर्वी नीट धुवून घ्याव्यात. काहीवेळा फक्त भाज्या धुवून घेणे फायदेशीर नसते तर तुम्ही त्या गरम पाण्यातही ठेऊ शकता. त्यात हळद आणि मीठ घालु शकता. तुम्ही भाज्या उकळूनही खाऊ शकता. यामुळे कोणताही अपाय होणार नाहीच पण आवश्यक ती पोषकद्रव्ये तुम्हाला मिळतील.

कच्च्या भाज्या खाणं पूर्णपणे बंद करायच्या का?तर अजिबात नाही. तुम्ही सॅलड्स खाऊ शकता. पण दक्षता घ्या की तुम्ही त्या पाण्यामध्ये थोड्या उकळून घ्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या पद्धतीनेच भाज्या खाणं योग्य आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नvegetableभाज्या