शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उशीरा किंवा जास्त वयात लग्न केल्याने वाढते बाळ न होण्याची समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 11:28 IST

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत.

(Image Credit : HealthyWomen)

भारतात सध्या कपल्स एका मोठ्या समस्येने हैराण झाले आहेत. ती म्हणजे दहापैकी एक कपल बाळ न होण्याच्या समस्येने हैराण आहेत. याचं कारण तरूणांमध्ये वाढती इनफर्टिलिटीची समस्या. कधी कधी तर ही समस्या इतकी वाढते की, लोकांना पत्ताही लागत नाही. तसेच एक सामान्य धारणा अशीही आहे की, वय जास्त झाल्यावर लग्न केल्यास इनफर्टिलिटीचा धोका अधिक वाढतो. चला जाणून घेऊ याबाबत आणखी माहिती.

हैराण करणारी आकडेवारी

thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार, बाळ होण्यास अडचण येण्याची समस्या म्हणजेच इन्फ्रर्टिलिटीची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये फार वाढली आहे. एका सर्व्हेनुसार, भारतात जवळपास २ कोटी ७५ लाखांपेक्षा अधिक कपल्स इन्फर्टिलिटीचे शिकार आहेत. म्हणजे दर १० पैकी १ कपल लग्नानंतर बाळा जन्म देण्यात सक्षम नाहीये. याबाबत लोकांमध्ये अनेक चुकीच्या धारणा असतात. पण तज्ज्ञ मानतात की, जास्तीत जास्त लोकांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या ही त्यांच्या चुकीच्या सवयींमुळे येते.

जास्त वयात लग्न करणे

आजकालची तरूणी पिढी करिअर सेट झाल्यावर आणि आर्थिक रूपाने सक्षम झाल्यावर लग्न करण्याचा निर्णय घेतात. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त तरूण-तरूणी ३० ते ३२ वयादरम्यान लग्न करू इच्छितात. तसेच लग्नानंतरही काही वर्ष त्यांना मुल होऊ द्यायचं नसतं. तज्ज्ञ यावर सांगतात की, ३५ वयानंतर महिलांना आई होण्यासाठी सामान्यांपेक्षा अधिक अडचणी येतात. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये नॉर्मल डिलीव्हरीऐवजी ऑपरेशन करावं लागतं. अनेक जोडप्यांमध्ये शुक्राणूंची क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे त्यांना अडचणी येतात.दुसरं कारण जे आजकाल जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये पाहिले जातात ते म्हणजे फायब्रायड तयार होणं, एन्डोमॅट्रियमशी संबंधित समस्या. वाढत्या वयात हायपरटेंशनसारख्य दुसऱ्या समस्याही होतात आणि याकारणाने महिलांची फर्टिलिटी प्रभावित होते, असे सांगितले जाते. 

स्पर्म क्वॉलिटी

आजकाल कमी वयात सिगारेट, मद्यसेवन, गुटखा आणि वेगवेगळे ड्रग्स पदार्थ सेवन करण्याची सवय काही तरूण-तरूणींमध्ये वाढली आहे. या सवयींमुळे वीर्याची गुणवत्ता खराब होऊ लागते आणि स्पर्म काउंट कमी होतं. याने होणाऱ्या बाळावर आनुवांशिक रूपाने बदलही होऊ शकतात. याचप्रमाणे अल्कोहोल सुद्धा टेस्टोस्टेरॉनचं उत्पादनही कमी होतं. 

कामाचा वाढता ताण

आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रात काम आणि यशाचं दबाव आधीपेक्षा अधिक वाढला आहे. याकारणाने लोकांना ओव्हर टाइम, नाइट शिफ्ट किंवा घरी काम करावं लागतं. कामासोबतच शरीरासाठी आरामही गरजेचा आहे. पण त्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाहीये. लोक एक्सरसाइजही करत नाही आणि खाण्या-पिण्याकडेही त्यांचं लक्ष नसतं. याने हळूहळू व्यक्तीच्या स्पर्मची क्वॉलिटी खराब होते असं सांगितलं जातं. 

(टिप : वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. केवळ माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या माहितीकडे उपाय किंवा उपचार म्हणून बघू नका. तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealth Tipsहेल्थ टिप्स