किनारपट्टी भागात भात हे मुख्य अन्न आहे. येथील लोक चपातीच्या तुलनेत बहुतेक लोकं भात खाणं पसंत करतात. तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, फायबर, लोह, थायमिन आणि राइबोफ्लेविनचे भरपूर प्रमाणात असतं. भातमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं तसंच खनिजं आढळतात. जी शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. मात्र लक्षात घ्या तांदूळ हा शिजवलेलाच असला पाहिजे. तांदुळ शिजवूनच त्याचे सेवन केले पाहिजे तरच तांदूळ फायदेशीर ठरतो. मात्र, काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असेल तर तुम्हाला ही सवय महागाच पडू शकते.
चयापचय क्रियेत अडथळाकच्च्या भातमध्ये लेक्टीन हे प्रोटीन आढळतं. हे खरंतर एक कीटकनाशक म्हणून काम करतं. त्यामुळे कच्च्या तांदळाचं सेवन टाळलं पाहिजे. यामुळे पचनासंबधित समस्या उद्भवू शकतात.