Afternoon napping : बऱ्याच लोकांना सवय असते की, ते दुपारी काही वेळ झोपतात. अनेक ठिकाणी दुपारी दुकाने बंद होतात. कारण त्या लोकांची रात्री चांगली झोप झालेली नसते किंवा दिवसा काम जास्त झालं असेल किंवा त्यांना थोडा आराम करायचा असतो. दुपारी थोडा वेळ झोपणं रिफ्रेशमेंटसारखं असतं. आज आम्ही तुम्हाला दुपारी झोपण्याचे फायदे आणि काही नुकसान सांगणार आहोत.
दुपारी झोपण्याचे फायदे
रात्री काम करणारे लोक जास्त वेळ जागत असतात. ज्यामुळे थकवा वाढतो. जर ही स्थिती जास्त काळ राहिली तर थकवा अजिबात कमी होणार नाही. अशात तणाव कमी करण्यासाठी दिवसा काही वेळ झोप घेणं फायदेशीर ठरू शकतं.
बरेच लोक सायंकाळ होता होता थकून जातात. याबाबत एक्सपर्ट सांगतात की, शरीराचं तापमान दर 12 तासांनी थोडं कमी होतं. असं सामान्यपणे दुपारी होतं आणि अशात व्यक्तीला थकवा जाणवतो. त्यामुळे दिवसा 30 मिनिटांची एक झोप तुम्ही घेऊन थकवा दूर करू शकता.
दुपारी झोपण्याचे नुकसान
लोकांचं दुपारी झोपणं कॉमन आहे. पण दुपारी जास्त वेळ झोपणं फार घातक ठरू शकतं. याने तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. अशात दुपारी जास्त वेळ न झोपण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, दुपारी जास्त वेळ झोपल्याने स्ट्रोकचा धोका 20 टक्के अधिक वाढतो. हे मेडिकल जर्नल ऑफ अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या शोधात सांगण्यात आलं आहे. यातून समोर आलं की, जे लोक दुपारी 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपतात त्यांना स्ट्रोकचा धोका 25 टक्के वाढतो.
मुद्दा दुपारी झोपण्याचा नाही तर काही लोकांची लाइफस्टाईल अशी असते की, ते रात्री केवळ काही तासच झोपू शकतात. असं करणं आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं पुरेशी झोप न घेतल्याने डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, लठ्ठपणा आणि इतकंच काय तर डिप्रेशनही होऊ शकतं.