Do a six minute walk test at home every day! | दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट!

दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट!

वाशिम : दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करून फुफ्फुसांचे आरोग्य तसेच ऑक्सिजन पातळी तपासणी करणे घरातल्या घरात अगदी सहज शक्य आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, हे घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनीट वॉक टेस्ट) करून पाहता येणार आहे.

सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. घरच्या घरी चाचणी करून आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य तपासता येणार आहे. सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीने नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल. यामुळे गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली, तरी ऑक्सिजन पातळी नेमकी कशी आहे, हे दररोज तपासून घेणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता आवश्यक ठरत आहे.

कोणी करायची ही टेस्ट

ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात.

अशी करावी चाचणी

ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे. (पायऱ्यांवर चालू नये) यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये, तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही, तर प्रकृती उत्तम असे समजावे.

... तर घ्या काळजी

जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा चालल्यानंतर धाप लागल्यासारखे वाटत असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-------------

दररोज सहा मिनिटे वॉक टेस्ट करून ऑक्सिजन पातळी तपासणी करता येते. ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो, त्यांनी ही चाचणी करू नये. ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालून ही चाचणी करू शकतात.

डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Do a six minute walk test at home every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.