शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

घरातील सर्वांचे टूथब्रश एकत्र का ठेवू नये? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:05 IST

दात आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर टूथब्रशची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तो कुठे ठेवावा, कसा ठेवावा या गोष्टी फार सामान्य वाटत असल्या तरी त्याबाबत निष्काळजी करुन चालणार नाही.

टूथब्रश हा आपल्या दैनंदिन कामातील महत्त्वाचा भाग आहे. अभ्सासकांचं म्हणनं आहे की, ब्रशची योग्यप्रकारे स्वच्छता न केल्यास टूथब्रश घरातील तिसरी सर्वात घाण असलेली जागा बनू शकतो. घाणेरड्या टूथब्रशने डायरिया किंवा स्कीन इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो. अशावेळी दात आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर टूथब्रशची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तो कुठे ठेवावा, कसा ठेवावा या गोष्टी फार सामान्य वाटत असल्या तरी त्याबाबत निष्काळजी करुन चालणार नाही.

टूथब्रश भिजवू नका

जास्तीत जास्त लोक हे आधी टूथब्रश भिजवतात आणि मग त्यावर टूथपेस्ट लावतात. ब्रश भिजवल्यानंतर त्याचे दाते नरम होतात. पण असे केल्याने ब्रशची दात चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. असं न करण्याचा डॉक्टरही सल्ला देतात कारण अशाने टूथब्रश खराब होतो. तसेत भिजलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावल्याने पेस्टचा प्रभावही कमी होतो. त्यामुळे दात स्वच्छ करण्याआधी टूथब्रश भिजवू नका आणि जर तसे करणे गरजेचेच आहे तर १ सेंकदापेक्षा जास्त तो पाण्याखाली धरु नका.

टॉयलेटमध्ये ठेवू नका

अनेक घरांमध्ये टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याची जागा फारच जवळ असते. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर अनेक किटाणू उडतात आणि ते सहजपणे आजूबाजूच्या वस्तूंवर सहज जाउन बसतात. त्यात ब्रशही असतो. त्यामुळे ब्रश कधीही टॉयलेटच्या आजूबाजूला ठेवू नये. ज्या बॉक्समध्ये टूथब्रश ठेवता तो बॉक्स आठवड्यातून एकदा नक्की स्वच्छ करा. असे केल्याने त्यातील बॅक्टेरिया ब्रशमध्ये जाणार नाहीत. 

बंद करुन ठेवू नका

आजकाल बाजारात ब्रशसोबत त्याचे दाते झाकून ठेवण्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस मिळतात. पण ब्रश अशाप्रकारे बंद करुन ठेवणे योग्य नाहीये. याने ब्रशमधील किटाणू वाढतात. सोबतच टूथब्रशचा वापर करुन झाल्यावर तो सरळ उभा ठेवा. याने ब्रशमधील पाणी खाली जाईल आणि ब्रश लगेच कोरडा होईल. याने ब्रशमध्ये किटाणू वाढण्यासाठी लागणारा ओलावाही राहणार नाही.

वेगवेगळे ठेवा सर्वांचे ब्रश

ही चूक जवळपास प्रत्येक घरात केली जाते. पूर्ण परिवाराचे ब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवले जातात. डॉक्टरांनुसार, असे केल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये सहजपणे शिरतात. त्यामुळे सर्व ब्रश एकत्र ठेवू नका. 

टूथब्रशची स्वच्छता

अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, दर तीन महिन्यांनी ब्रश बदलायला हवा. तसेच ब्रशच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. ब्रशचे दाते पसरले असेल तर ब्रश बदला. जर तुम्ही एखाद्या गंभीर आजारातून नुकतेच बाहेर आले असाल तर ब्रश नक्की बदला.

या गोष्टींची घ्या काळजी

- ब्रश हवेमध्ये सुकायला ठेवा, याने फंगस होणार नाही.- ब्रशमधील घाण स्वच्छ करण्यासाठी ब्रश उकळत्या पाण्यात ५ मिनिटांसाठी ठेवा.- टूथब्रशचं डोकं एका ग्लासमध्ये ठेवून त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि पाणी टाकून थोडावेळ भिजवा.- दात फार ताकद लावून घासत बसू नका. याने हिरड्यांना इजा होऊ शकते.- ब्रश केल्यानंतर बोटांनी हिरड्यांची हळूहळू मसाज करा. याने हिरड्या मजबूत होतील.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य