आपल्या बाळाला दुध पाजत असताना सगळ्याच  मातांना  एक प्रश्न पडत असतो तो म्हणजे आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा. कारण बाळासाठी सुद्धा ते महत्वाचं असणं गरजेचं असतं. कारण बाळाला दूध पाजत असताना तुम्ही ज्या पदार्थांचा आहारात समावेश करत असता त्यातील घटक बाळाला मिळत असतात. या कालावधीत संतुलीत आहार घेण्याची गरज असते. कारण अनेकदा आहार चुकीचा आहार नकळपणे घेतल्यामुळे बाळाला उलटया होणे, एलर्जी होणे. यांसारख्या समस्या उद्भवतात.

Image result for breastfeeding
(image credit- medicalnewstoday)

मसाल्याचे पदार्थ

Image result for spices
बाळाला अंगावरचे दुध पाजत असताना लसूण, लाल मिरची, दालचीनी यांचं  सेवन  करू नका. त्यामुळे गॅस होण्याची आणि  आतड्यांमध्ये वेदना होण्याची  शक्यता असते.स्तनपान करत असताना मासांहार जास्त प्रमाणात करू नये. अननस,संत्री व्हिटामीन सी असलेली फळं खावीत. आहारात टॉमेटॉ. लिंबू यांचा समावेश करावा. 

कॅफीनच सेवन कमी  करा

Related image

स्तनपान करत असताना दोन कपांपेक्षा अधिक  प्रमाणात कॅफिनचं सेवन  करण्यापेक्षा  आवश्यकता असेल तेव्हा एखादा कप चहा घ्या. कॅफिनचं सेवन जितकं कमी करालं तितर तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरेल. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर निकोटीनची मात्रा अधिक असल्यामुळे तुम्हाला  स्तनपान करताना समस्या नि्र्माण होते.  त्यामुळे बाळाला उलटी, झोप न येणे, श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

फायबर असेलेले पदार्थ खा

Image result for breastfeeding(image credit- sharecare)

फायबर असलेल्या भाज्यांचे सेवन फायदेशीर ठरतं असते. त्यासाठी पत्ता कोबी, फ्लॉवर आणि काकडी, ब्रोकली यां भाज्यांचा समावेश आहारात करा. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला एलर्जी होण्याची शक्यता असते. 

Web Title: Do not eat these food while breastfeeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.