स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:01 PM2018-12-27T12:01:33+5:302018-12-27T12:05:26+5:30

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात.

Do 10 minute dance and get rid of stress | स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

googlenewsNext

(Image Credit : Shakthi Health & Wellness Center)

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात. काही लोकांना त्यांना तणाव असल्याचं कळतं, पण काहींना कळतही नाही. अशात नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नाही. मात्र अनेक शोधांनुसार, सतत येणाऱ्या तणावामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी होतं. पण हा तणाव दूर कऱण्यासाठी एक सोपा उपाय समोर आला आहे. 

डान्स केल्याने तणाव होतो कमी

(Image Credit : The New York Times)

दररोज १५ मिनिटे डान्स केल्याने एंजॉर्फिन लेव्हल नियंत्रित राहतं. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर होते. डान्स केल्यानंतर तुम्हाला हलकं जाणवतं. कारण याने कॅलरी कमी होतात. डान्सने मन आणि शरीर यांत्यात समतोल साधला जातो. तसेच डान्स केल्याने शरीर लवचिकही होतं. 

हृदय राहत निरोगी

इटलीमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, ज्या लोकांना हृदयासंबंधी आजार आहेत. त्यांनी रोज डान्स करायला हवा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. डान्स केल्याने हृदयात रक्तप्रवाह चांगला होतो. तसेच डान्स केल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. अमेरिकेतील नॅशनल हार्ट, लंग अॅन्ड ब्लड इन्स्टिट्यूट द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, बॉल डान्सने कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका कमी होतो. 

डान्स करा वजन कमी करा

जर तुम्ही दररोज डान्स करत असाल तर याने तुमच्या १५० ते ५०० कॅलरी बर्न होतात. त्यामुळे झुम्हा डान्सला वजन कमी करण्यासाठी चांगला डान्स मानला जातो. हा डान्स जर तुम्ही ६० मिनिटांसाठी केला तर ४०० ते ६०० कॅलरी बर्न होतात. तसेच मांसपेशीमध्ये ताणही येतो. पोटाच्या मांसपेशी लवचिक होतात. त्यामुळे पचनक्रियाही चांगली होते. 

हाडे होतात मजबूत

तारुण्यात जर तुम्ही डान्सचा तुमच्या दैंनंदिन जीवनात समावेश केला तर वाढत्या वयात तुम्हाला हाडांशी संबंधित आजार कमी होतील. याने ऑस्टियोपोसोसिस ठीक होतो. डान्सने हार्मोन्स नियंत्रित होतात. याने हाडांमधील कॅल्शिअम कमी होणं रोखलं जातं. 

एक्सपर्टचा सल्ला

डान्स करणे आपल्या भावना व्यक्त करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. जे अनेकजण बोलून व्यक्त करत नाहीत ते डान्सने करु शकतात. कारण शारीरिक हालचाह ही विचार आणि जाणिवांशी संबंधित असते. त्यामुळेच तुमच्यात सकारात्मक बदल बघायला मिळतात. पण यासाठी एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्यावा.

वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तींना येणारा ताण हा नेहमीच त्रासदायक असतो. ताण कमी असेल तर फार फरक पडत नाही पण हाच जर जास्त झाला तर याचा जीवनावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो. प्रमाणापेक्षा जास्त ताण आल्याने ऑफिस किंवा घरातील तुमची सर्व कामे प्रभावित होऊ शकतात.ही ती स्थिती असते जेव्हा एखादी व्यक्ती सहन करण्याची क्षमता गमावून बसतो. या कारणाने ही व्यक्ती कामात चांगलं प्रदर्शन करु शकत नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, तणावाचं प्रमाण हे वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि वैयक्तिक क्षमतेनुसार वेगवेगळी असते. 

तणावाचं प्रमाण पॅरामिटर्सच्या आधारावर मॉनिटर केलं जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला तणावाच्या स्त्रोतापासून दूर जायचं असेल तरच...तणावाच्या मोठ्या कारणांपासून बचाव करण्याची इच्छा हे तणाव वाढण्याचं मुख्य कारण असण्याचं संकेत आहे. डॉक्टरांनुसार, 'अनेकजण जास्त तणावाच्या वातावरणात जीवन जगणे सुरुच ठेवतात. त्यांना या गोष्टींची माहितीच नसते की, सतत होणारी डोकेदुखी, सतत येणारा राग आणि शांत झोप न लागणे ही तणावाची कारणे असू शकतात. हे सामान्य लक्षण तणावाची असू शकतात आणि हे तुम्हाला स्वत:ला ओळखावी लागतात. जेव्हा तुमचा तणाव प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा तुमचं दैनंदिन जीवन प्रभावित होतं'.

Web Title: Do 10 minute dance and get rid of stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.