डोळे सांगतात तुमच्या आरोग्याची स्थिती; चुकूनही करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 12:59 PM2019-11-03T12:59:12+5:302019-11-03T13:00:20+5:30

आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे, डोळे. डोळे आतिशय संवेदनशील अवयवय असून त्यांना प्रकाशाची जाणीव होते. डोळ्यांमुळे आपण एखादी वस्तू पाहू शकतो. पण हे डोळे फार नाजूकही असतात.

Diseases conditions eyes are telling you health do not ignore | डोळे सांगतात तुमच्या आरोग्याची स्थिती; चुकूनही करू नका दुर्लक्ष

डोळे सांगतात तुमच्या आरोग्याची स्थिती; चुकूनही करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे, डोळे. डोळे आतिशय संवेदनशील अवयवय असून त्यांना प्रकाशाची जाणीव होते. डोळ्यांमुळे आपण एखादी वस्तू पाहू शकतो. पण हे डोळे फार नाजूकही असतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणंही तितकचं आवश्यक आहे. आपण आपल्या कामाच्या व्यापात आरोग्याची काळजी घेतो पण डोळ्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो.  तसेच डोळ्यांवरूनही तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्या जाणून घेणं शक्य असतं. जाणून घेऊया सविस्तर... 

डोळ्यांखालील काळी वर्तुळं

तणाव, ऊन, प्रदूषण किंवा थकवा यांसारख्या समस्या उद्भवल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागतात. यासाठ सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, डोळ्यांना आराम द्या. भरपूर झोप घ्या आणि तणावापासून दूरच राहा. 

आय बॅग 

डोळ्यांच्या खालच्या भागात सूज आल्यासारखे दिसत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा शरीरात होणाऱ्या पोषणाच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली सूज दिसू लागते किंवा आय बॅग्स तयार होतात. पण ही समस्या बराच काळ राहिली तर किडनी, ओवरी किंवा यूट्रसमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे याकडे गांभिर्याने पाहणं आवश्यक आहे. 

डोळे सतत लाल दिसणं 

डोळे सतत लाल दिसत असतील तर डोळ्यांना अॅलर्जी झाल्याचं लक्षण असतं. सतत उन्हात राहिल्याने किंवा बाहेर फिरल्याने धुळीचे कण डोळ्यांत जातात आणि त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहे की, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांसाठी चांगल्या सनग्लासेसचा वापर करा. 

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी उपाय 

जर तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर केळी स्मॅश करून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि जवळपास 10 ते 15 मिनिटांपर्यंत तसचं ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने डोळे आणि आजूबाजूची त्वचा स्वच्छ करा. त्वचेखाली असलेलं अतिरिक्त फ्लूइड दूर करून डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी केळ मदत करतं. 

पिवळे डोळे

डोळे पिवळे दिसत असतील तर ते काविळीचं लक्षणं समजलं जातं. अनेकदा सतत उष्ण पदार्थांचं सेवन केल्याने किंवा सतत मद्यसेवन केल्यानेही डोळे पिवळे दिसू लागतात. तसेच पोटातील उष्णता वाढल्यानेही डोळे पिवळे दिसतात. 

डॉक्टरांचा सल्ला घ्या

डोळे आपल्या आरोग्याबाबतही संकेत देत असतात. पण अशावेळी कोणत्याही घरगुती उपायांऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. खासकरून लिव्हर आणि किडनीशी निगडीत आजारांबाबात संकेत मिळत असतील तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Diseases conditions eyes are telling you health do not ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.