कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:06 PM2020-03-23T12:06:03+5:302020-03-23T12:08:45+5:30

अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे  मरणाचं  कारण हे आजार ठरत असतात.

Disease that killing people every year ,serious disease compare to corona myb | कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

Next

कोरोनामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण तयार आहे. पण आज आम्ही  तुम्हाला  कोरोनापेक्षाही गंभीर असलेल्या आजारांबद्दल सांगणार आहोत. या आजारांमुळे जगभरासह भारतात सुद्धा  अनेक  लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे मरणाचं कारण हे आजार ठरत असतात. जाणून घ्या कोणते आहेत ते आजार.


 
डायबिटीस

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना  डायबिटीस या आजाराचं शिकार व्हाव लागतं.  आहारात वाढतं साखरेचं प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या सवयी निश्चिच नसणे यांमुळे  दरवर्षी १५ ते १६ लाख लोकांचा मृत्यू डायबिटीसमुळे होतो. विकसनशील देशात हे प्रमाण जास्त दिसून येतं. 

कॅन्सर

WHO च्या रिपोर्टनुसार २०१६ साली फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅन्सेटचा २०१९ सालचा रिपोर्ट आणि कार्डिओलॉजीच्या युरोपियन सोसायटीच्या २०१९ सालच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरला आहे.( हे पण वाचा-खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...)

हृदय रोग

हा हृदयाचा आजार आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयासंबंधी आजारामुळे दरवर्षी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. WHO च्या मते, गेल्या १५ वर्षांपासून हा आजार सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. WHO ने अशा जीवघेण्या १० इतर आजारांची सूची जारी केली आहे. ज्यामध्ये श्वसनसंबंधी संसर्ग, डायरिया, टीबी, अल्झाइमर, डिमेन्शिया यांचा समावेश आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!)

Web Title: Disease that killing people every year ,serious disease compare to corona myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.