Diabetes symptoms : लगेचच तपासून घ्या 'ब्लड शुगर लेव्हल', जर लघवीच्या रंगात झाला असेल 'असा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:54 AM2021-03-24T11:54:19+5:302021-03-24T12:02:35+5:30

Diabetes symptoms :  जर शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर लघवी क्लाऊडी किंवा बदलेल्या रंगाची दिसू शकते. यावेळी लघवीतून तीव्र घाण वास येऊ शकतो. काहीजणांसाठी डायबिटीसचं हे पहिलं लक्षण असू शकतं. 

Diabetes symptoms: Can cloudy urine be a sign of diabetes | Diabetes symptoms : लगेचच तपासून घ्या 'ब्लड शुगर लेव्हल', जर लघवीच्या रंगात झाला असेल 'असा' बदल

Diabetes symptoms : लगेचच तपासून घ्या 'ब्लड शुगर लेव्हल', जर लघवीच्या रंगात झाला असेल 'असा' बदल

googlenewsNext

मुत्राचा रंग बदलणं, मुत्रातून तीव्र घाणेरडा वास येणं अशी काही लक्षणं डायबिटीसचे संकेत असू शकतात. डायबिटीसमुळे किडनीची समस्या आणि युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनचाही धोका वाढतो. अनेक कारणांमुळे मुत्राचा रंग बदलू शकतो. डायबिटीसमुळेच ही स्थिती उद्भवते असं काहीही नाही. पण तरिही तुम्ही चिंतीत असाल तर या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. सतत तहान लागणं, सतत लघवी येणं ही याची मुख्य लक्षणं आहेत.  खरंच मुत्राचा रंग बदलणं डायबिटीसचा संकेत असू शकतं का? याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. 

सामान्यपणे मधुमेह असलेल्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात इंसुलिन तयार होत नाही. हा प्रकार हाय लेव्हल ब्लड शुगरचं कारण ठरू शकतो. किडनी फिल्टर करून शरीरातील अतिरिक्त पदार्थ बाहेर काढून टाकते. तेव्हा लघवी  बाहेर येते. पण  जर शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर लघवी क्लाऊडी किंवा बदलेल्या रंगाची दिसू शकते. यावेळी लघवीतून तीव्र, घाण वास येऊ शकतो. काहीजणांसाठी डायबिटीसचं हे पहिलं लक्षण असू शकतं. 

अनेकदा डायबिटीसमुळे किडनीवरही परिणाम होत असतो. ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज वाढण्याचा धोका जास्त असतो. किडनीचा आजार असलेल्या लोकांच्या मुत्रात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असू शकतात. प्रोटिन्सचं प्रमाण जास्त झाल्यामुळे रंग बदलेला दिसू शकतो. याशिवाय डायबिटीसमुळे यूटीआयसुद्धा  होण्याचा धोका जास्त असतो.  

लघवीचा रंग बदलण्याची कारणं

युटीआय असल्यास व्हाईट ब्लड सेल्सच्या उपस्थितीमुळे मुत्राचा रंग फेसाळलेला होऊ शकतो. 

क्लाउडी यूरिन असण्याचं सगळ्यात मुख्य कारण डिहायड्रेशन हे आहे. पाणी कमी प्यायल्यानं डिहायड्रेशन होतं. त्यामुळे गडद रंगाची लघवी दिसते.  यापासून बचावासाठी दिवसभरातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यायलाच हवं.

वेजाइनाइटिसमुळेही मुत्राचा रंग बदलतो. योनित येत असलेल्या सुजेला वेजाइनायटीस असं म्हणतात. काही बॅक्टेरियांमुळे योनित सूज येते.  या आजारात योनिच्या आजूबाजूला खाज येणं, दुर्गंधी येणं, लघवी करताना जळजळ होणं अशी लक्षणं दिसून येतात. 

आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल तर लघवीचा रंग बदलतो.  लघवी करताना वेदना होणं,  लाल, गडद पिवळ्या रंगाचे मुत्र होणं ही लक्षणं आहेत. अनेकदा योन संक्रमण झाल्यास लघवीचा रंग बदलेला दिसतो.  यामुळे गुप्तांगात खाज येणं. योनित वेदना, शरीर संबंधांदरम्यान वेदना होणं अशी लक्षणं जाणवतात.

तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

आपण घेतलेला आहार देखील याला आणखी एक संभाव्य कारण असू शकतो. बर्‍याचदा जास्त दूध प्यायल्याने किंवा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ सेवन केल्यास लघवीचा  रंग बदलतो. तुम्हालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

Web Title: Diabetes symptoms: Can cloudy urine be a sign of diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.