शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणात सेवन करा 'हे' पदार्थ, ठरेल भरपूर फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:22 IST

आज आपण डायबेटीजच्या रुग्णांच्या दुपारच्या जेवणाच्या आहाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवणाच्या ताटात काय समाविष्ट करावे. (The Best Foods for diabetic patients)

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जीवनशैलीसोबतच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही थोडासाही निष्काळजीपणा केला तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. मधुमेही रुग्णांनी (diabetic patients) कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करु शकतात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण डायबेटीजच्या रुग्णांच्या दुपारच्या जेवणाच्या आहाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांसाठी जेवणाच्या ताटात काय समाविष्ट करावे. (The Best Foods for diabetic patients)

धान्य आणि कडधान्य (grains and lentils)मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात संपूर्ण धान्य आणि कडधान्यांचा समावेश करावा. याचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना पोटॅशियम, फायबर सारखे अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात.

हिरव्या पालेभाज्या (green vegetables)डायबिटीजच्या रुग्णांनी आपल्या आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. उदाहरणार्थ, तुम्ही मेथी, पालक, कारले आणि दुधी यांचे सेवन करू शकता. या सर्व भाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि अधिक पोषकतत्व असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असतात.

दही (curd)दही खायला सर्वांनाच आवडते. जेवणाच्या ताटात दही दिसले तर खाण्याचा आनंद द्विगुणित होतो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः डायबिटीज रुग्णांसाठी (Diabetic patients) फायदेशीर मानले जाते. आपण ते दुपारच्या जेवणात समाविष्ट केले पाहिजे. यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच यामध्ये CLA आढळते, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. याशिवाय हे वजन कमी करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स