Diabetes drug metformin hydrochloride recalled fears cancer causing ingredient | डायबिटिसच्या 'या' औषधामुळे उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका, कंपनीने परत मागवली औषधं

डायबिटिसच्या 'या' औषधामुळे उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका, कंपनीने परत मागवली औषधं

जीवघेण्या कॅन्सरचा धोका लक्षात घेता एका प्रसिद्ध औषध कंपनीने डायबिटीसची औषधं बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. Metformin Hydrochloride या औषधाला एका केमिकलचे नाव आहे. द सन या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार या औषधात कॅन्सरचा धोका वाढवत असलेल्या पदार्थाचा समावेश मोठया प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार डायबिटिसचे औषध Metformin Hydrochloride यामध्ये N-Nitrosodimethylamine (NDMA) जास्त प्रमाणात असतं. 

मेटामॉर्फिन तयार करणारी कंपनी मार्कसंस फार्मा लिमिटेडने बाजारातून हे औषधं परत मागवण्याची घोषणा केली आहे.  याआधीही  जून महिन्यात काही औषधंही बााजारातून परत मागवण्यात आली होती.बाजारात मार्कसंस फार्मा लिमिटेडचे हे औषध Time-Cap Labs नावाने विकलं जाते. बाजारातील 500mg आणि 750mg च्या औषधांना परत मागवले जात आहे. यापेक्षा कमी डोस असल्यास धोका नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे. 

हे औषध डायबिटिसच्या रुग्णांमध्ये साखरेचं प्रमाण कमी करण्यसाठी उपयुक्त ठरते. FDA  दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत डॉक्टरर्स या औषधाला  इतर औषधांचा पर्याय सुचवत नाहीत तोपर्यंत या औषधांचे सेवन सुरू ठेवायला हवे.  सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार FDAची या औषधावर तपासणी सुरू आहे. या औषधांमध्ये NDMA चे प्रमाण कोणत्या कारणामुळे जास्त आहे याबाबत माहिती  घेतली जात आहे. साधारणपणे इतर औषधांमध्ये NDMAचे प्रमाण कमी असते त्यामुळे शरीराला धोका कमी असतो.  

कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज'

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस (आयआयएससी), बँगलुरूच्या संशोधकांनी त्वचेच्या कॅन्सरला म्हणजे ट्यूमरला नष्ट करणारं  खास बँडेज तयार केलं आहे. त्वचेचा कॅन्सर प्रामुख्याने सूर्यातून बाहेर येत असलेल्या  पॅराबॅगनी किरणांच्या जास्तवेळ संपर्कात राहिल्यामुळे  होतो.  मानेला त्रास  होणं, कपाळ, गळा, डोळ्यांची जळजळ होणं ही त्वचेच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणं आहेत. त्वचेचा कॅन्सर झाल्यास ट्यूमरच्या पेशींची वाढ व्हायला सुरूवात होते. आयआयएससी बँगलुरूच्या संशोधकांनी या पेशींना नष्ट करत असलेले बँडेज तयार करण्याचा दावा केला आहे.  सावधान! पुरूषांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांनी सांगितली कारणं अन् लक्षणं

इलेक्ट्रोस्पिनिंगच्या माध्यमातून हे बँडेज विकसित केले आहे. आयआयएससीमध्ये सेंटर फॉर बायोसिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (बीएसएसई) आणि आण्विक विकास, अनुवांशिकी विभागाच्या तज्ज्ञांनी इलेक्ट्रोस्पिनिंगचा वापर करून ही बँडेजपट्टी तयार केली आहे. यात चुंबकिय नॅनो फायबरर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना गरमी देऊन नष्ट करता येऊ शकतं. या शोध अध्ययनाने त्वचेच्या कॅन्सरच्या उपचारात एक आशेचा किरण दाखवला आहे.  सावधान! नाकाला 'ही' २ लक्षणं जाणवत असतील तर असू शकतो कोरोनाचा धोका

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Diabetes drug metformin hydrochloride recalled fears cancer causing ingredient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.