आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:14 PM2024-06-14T22:14:50+5:302024-06-14T22:15:36+5:30

भारतात डेंग्यूमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो.

Dengue Vaccine in India: Dengue vaccine will now be available in India; ICMR starts Phase III trial... | आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

Dengue Vaccine in India : भारतात डेंग्यूमुळे(Dengue) दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. मादी एडिस डासामुळे पसरणाऱ्या डेंग्यूवर आतापर्यंत कोणतेही प्रभावी उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, आता लवकरच भारताला डेंग्यूची लस (Dengue Vaccine) मिळणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने ही याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. 

भारतात आतापर्यंत कोरोनापासून ते सर्व्हाइकल कँसरसारख्या आजारांची लस बनवण्यात आली आहे, पण डेंग्यूची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना अपयश आले होते. पण, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, भारताला लवकरच स्वदेशी बनावटीची डेंग्यूची लस मिळणार आहे. 

दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण
डेंग्यूची लस भारतात तयार झाली असून, दोन टप्प्यांच्या चाचण्याही झाल्या आहेत. या दोन्हीच्या यशानंतर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी केवळ ICMR द्वारेच घेतली जाते. पहिल्या चाचणीत लसीच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती. तर, दुसऱ्या चाचणीत अँटीबॉडीज तयार करते की नाही, हे पाहिले गेले. आता तिसऱ्या चाचणीत हीडेंग्यूवर परिणामकारक आहे की नाही, याची चाचपणी केली जाईल.

कधी मिळणार?
डेंग्यू लसीची फेज 3 चाचणी कधी पूर्ण होईल आणि डेंग्यू रोखण्यासाठी ही लस भारतातील लोकांना कधी उपलब्ध होईल, याची माहिती ICMR शास्त्रज्ञ डॉ. सरिता नायर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, डेंग्यू लसीची फेज-3 चाचणी या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होणार आहे. म्हणजेच 2024 च्या जुलै-ऑगस्टपासून ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. ही चाचणी देशभरातील 19 ठिकाणांवर केली जाईल. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागू शकतात.

Web Title: Dengue Vaccine in India: Dengue vaccine will now be available in India; ICMR starts Phase III trial...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.