शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Cytomegalo Virus: कोरोनातील नवा संधिसाधू! 'सायटोमेगॅलो व्हायरस' ठरतोय जीवघेणा; राजीव सातवही ठरले बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 07:26 IST

आपल्या अवतीभोवती पाण्यात, मातीत किंवा आपल्या नाकात, आतड्यांत अनेक जीवजंतू असतात

डॉ. मंगला बोरकर प्राध्यापक, जेरियाट्रिक्स, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी), औरंगाबादपरवा एका मान्यवरांचे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर तीन आठवड्यांनंतर सायटोमेगॅलो व्हायरसने दु:खद निधन झाल्याची बातमी समजली. कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी स्टेरॉइड्स द्यावे लागतात, तसेच टोसिलिझुमॅबसारखे (जीवरक्षक नाही असा निष्कर्ष आहे तरी) औषध वापरण्यात येते.  ही औषधे मार्गदर्शक तत्त्वे पाळून आवश्यकता असेल तरच आणि कमीत कमी प्रमाणात द्यायला हवीत. या औषधांमुळे रुग्णांची इम्युनिटी खूप कमी होते. 

आपल्या अवतीभोवती पाण्यात, मातीत किंवा आपल्या नाकात, आतड्यांत अनेक जीवजंतू असतात. जर एखाद्याची प्रतिकारशक्ती कमी झाली तर निद्रस्थ अवस्थेत राहणारे जीवजंतू या परिस्थितीचा फायदा घेऊन शरीरावर आक्रमण करतात. कोविडमधून वाचलेल्या गंभीर रुग्णांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यांनंतर होणारी “काळी बुरशी” सध्या धुमाकूळ घालत आहे. सायटोमेगॅलो व्हायरस हा विषाणूसुद्धा असाच संधिसाधू आहे. 

डॉ. किशोर पारगावकर, हृदयरोगतज्ज्ञ 

सायटोमेगॅलो व्हायरस (सीएमव्ही) हा एक सामान्यपणे आढळणारा विषाणू आहे.रोग्याच्या शारीरिक द्रावातून- जसे की लाळ, लघवी, दूध इ. यांचा फैलाव होऊ शकतो.सामान्य व्यक्तीला सहसा याचा कुठलाही त्रास होत नाही. फक्त काहींना ताप व अशक्तपणा जाणवू शकतो.ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना मात्र डोळे, फुप्फुस, यकृत, किडनी, मेंदू, आतडे अशा अनेक अवयवांना गंभीर इजा होेऊ शकते.आयजीएम अँटीबॉडी तपासणीद्वारे हा नुकताच झालेला आजार आहे का, हे कळते.यामध्ये गॅनसायक्लोव्हीर/ व्हॅलगॅनसायक्लोव्हीर या औषधांचा फायदा होतो.

डॉ. अनिल गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.

सायटोमेगॅलो व्हायरस हा विषाणू हरपीस जातीच्या विषाणूंपैकी एक आहे.एलायझा व पीसीआर चाचणीद्वारे या विषाणूचे निदान होऊ  शकते.मनुष्यापासून मनुष्याला शरीरातील स्रावातून पसरतो.बऱ्याच सामान्य लोकांमध्ये या विषाणूंचा संसर्ग झालेला असतो आणि कुठलीही लक्षणे नसतात.हा विषाणू लाळेच्या ग्रंथीत किंवा किडनीमध्ये शांतपणे राहतो; पण जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा हा शरीराच्या वेगवेगळ्या अवयांना हानिकारक ठरू शकतो.ज्या पेशींमध्ये हा विषाणू वाढतो त्या पेशींचा आकार खूप मोठा होतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या