Covid 19 soon antibodies prepared in lab to end coronavirus human testing to be completed by august | लॅबमध्ये तयार केलेल्या एँटीबॉडीने कोरोनाचा खात्मा होणार; 'या' महिन्यात पूर्ण होणार मानवी चाचणी

लॅबमध्ये तयार केलेल्या एँटीबॉडीने कोरोनाचा खात्मा होणार; 'या' महिन्यात पूर्ण होणार मानवी चाचणी

कोरोनाची लस तयार होण्याआधी प्रयोगशाळांमध्ये तयार करण्यात आलेली मोनोक्लोनल एंटीबॉडी रुग्णांसाठी संजिवनी ठरू शकते. आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला प्लाझ्मा उपलब्ध न  झाल्यामुळे अमेरिकेतील तज्ज्ञांनी कृत्रिम एंटीबॉडी तयार करण्याासाठी प्रयत्न केले आहेत. ऑगस्टपर्यंत या एँटीबॉडीजचे मानवी परिक्षण पूर्ण होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या एँटीबॉडीजचा वापर व्यापक स्वरूपातून केला जाऊ शकतो.

अमेरिकन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त कोरोनाला नष्ट करण्यासाठी नाही तर त्यामुळे शरीराला होत असलेल्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी ही थेरेपी फायदेशीर ठरू शकते. अमेरिकेतील तज्ज्ञ डेविड थॉमस यांनी सांगितले की, रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवण्याासाठी एँटीबॉडीजचे चांगले परिणाम दिसून यावेत. यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

एलर्जी आणि संक्रमक रोगांचे प्रमुख डॉ. एंथनी फॉकी यांनी सांगितले की, ''आम्ही मोनोक्लोनस एँटीबॉडी तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत. अनेक बायोटेक कंपन्या एंटीबॉडींचे मिश्रण करून परिक्षण करत आहेत. एँटीबॉडीज या संक्रमणाशी लढण्यासाठी शरीरात तयार होत असतात. तर मोनोक्लोनल एँटीबॉडीज व्हायरसशी लढण्यासाठी लॅबमध्ये कृत्रिमरित्या तयार केल्या जातात. त्यामुळे संक्रमणाला शरीरात पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. ''

एँटीबॉडीज थेरेपीमुळे दोन ते तीन महिन्यांपर्यंत संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. लस तयार होईपर्यंत आरोग्यविभागात कार्यरत असलेले कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेत काम  करणारे लोक यांच्यासाठी एँटीबॉडीज सुरक्षारक्षकाप्रमाणे काम करू शकतात. शंभर वर्षांपूर्वी रुग्णांसाठी ही थेरेपी संजीवनी ठरली होती.  १९१८ मध्ये फ्लूच्या माहामारीच्या काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी कान्वलेस्ट प्लाज्मा या थेरेपीचा वापर सार्स आणि मर्सच्या आजारासाठी केला जात होता. कॅन्सर, हृदय रोग, यांसारख्या गंभीर आजारांचे उपचार मोनोक्लोनल एँटीबॉडी थेरेपीने केले जातात. 

दरम्यान कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. प्लाझ्मा थेरेपीने अनेक देशांतील रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. सध्या डेक्सामेथासोन, रेमडीसिवीर, फेबीफ्लू या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. कोरोनाच्या माहामारी या एँटीबॉडी परिक्षणामुळे आशेचा किरण दाखवलेला आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना 'या' आजाराचा सगळ्यात जास्त धोका; ३ देशांतील तज्ज्ञांचा खुलासा

तुळस आणि मधाचा अर्क असलेली मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार; जाणून घ्या खासियत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid 19 soon antibodies prepared in lab to end coronavirus human testing to be completed by august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.