शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 6:32 AM

Coronavirus Vaccine for 12-18 Years Of Age : १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्याचा प्रयोग.

ठळक मुद्दे१२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्याचा प्रयोग.१२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत.

मुंबई : ‘झायडस कॅडिला’ कंपनीने मुंबई महापालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यामध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असून, लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने जम्बो कोविड केंद्र, कोरोना काळजी सेंटरमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

तर दुसरीकडे पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी महिनाभरापूर्वी ‘झायडस कॅडिला’ कंपनीला पत्र दिले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत झायडस कॅडिला कंपनीने लहान मुलांवरील लसीकरण करण्यास तयारी दाखवली आहे. यासाठी नायर रुग्णालयात पहिल्याच दिवशी दोन मुलांनी नोंदणीही केली आहे. नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरण केले जाणार आहे.

  • कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांना नोंदणीनुसार ८४ दिवसांनंतर दिला जात आहे, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. मात्र, १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत.
  • पहिल्या दिवशी, २८व्या दिवशी आणि ५६व्या दिवशी डोस दिला जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी नायरमध्ये प्रशिक्षित कर्मचारी व आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटल