Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:03 AM2020-06-29T02:03:20+5:302020-06-29T07:01:46+5:30

कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात.

Coronavirus: Understand ‘corona’: a disease more deadly than a cold-cough | Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

Next

अमोल अन्नदाते

कोरोना हा साध्या सर्दी-खोकल्यासारखा आजार असल्याचा घातक प्रचार समाज माध्यमांवर सुरू आहे. कोरोना हा माध्यमे, वैद्यकीय क्षेत्र, फार्मा कंपन्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे, त्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही, असे सांगणारे एक गीत समाज माध्यमांवर सक्रिय आहे. हे सगळे गैरसमज आहेत. कोरोना हा सर्दी, खोकल्यासारखा नव्हे तर त्या पेक्षा नक्कीच जास्त घातक व दखलपात्र आहे. यासाठी काही गोष्टी समजून घ्या.

१. सर्दी, खोकला हा आधी अस्त्विात असलेल्या कोरोनामुळे ही होतो पण कोविड-१९ या नव्या विषाणूचा जागतिक व देशातील मृत्यूदर सर्दी, खोकल्यापेक्षा जास्त आहे.
२. कोविड-१९ हा नवीन विषाणू असल्याने अजून त्याच्या विरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही व ती कशी असेल, अशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही हे अजून माहित नाही. पण नियमित सर्दी खोकल्याचे तसे नाही.
३. कोविड-१९ ची इतरांना संसर्ग करण्याची क्षमता ही साध्या सर्दी, खोकल्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणून एका कोरोनाबाधितांकडून मोठ्या संख्येने लोक संसर्गित होतात.
४. सध्या सर्दी खोकल्याचा फुप्फुस, हृदय व किडनीवर विशेष परिणाम होऊन प्राणघातक स्थिती निर्माण होत नाही. पण कोविड-१९ मध्ये मात्र हे होऊ शकते.
५. ज्यांना इतर काही दीर्घकालीन आजार आहे, त्यांना साध्या सर्दी खोकल्यामुळे जीवाला धोका संभवत नाही पण अशांना कोरोनामुळे मात्र धोका संभवतो. अशा दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या देशात प्रचंड आहे व त्यांच्या जीवाला धोका असल्याने कोविड-१९ नक्कीच दखलपात्र आहे.
कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात. म्हणूनच असे संदेश किंवा कोरोना हा काहीही नसून बागुलबुवा, षडयंत्र असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर फॉरवर्ड करू नये व आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली सर्व काळजी घ्यावी.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: Coronavirus: Understand ‘corona’: a disease more deadly than a cold-cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.