Coronavirus : कोविड-19 ग्रस्त रूग्णांकडून ९ दिवसांनंतर पसरत नाही संक्रमण, नव्या रिसर्चमधून दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:49 AM2020-07-30T11:49:19+5:302020-07-30T11:56:41+5:30

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, जर कोविड-१९ रूग्णाच्या घशात, नाकात, विष्ठेत नऊ दिवसांनंतरही कोरोना व्हायरस आढळून आला आहे.

Coronavirus : UK study says covid-19 patient cannot spread infection after 9 days | Coronavirus : कोविड-19 ग्रस्त रूग्णांकडून ९ दिवसांनंतर पसरत नाही संक्रमण, नव्या रिसर्चमधून दावा!

Coronavirus : कोविड-19 ग्रस्त रूग्णांकडून ९ दिवसांनंतर पसरत नाही संक्रमण, नव्या रिसर्चमधून दावा!

Next

जगभरात अजूनही कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. कोरोनाची लागण झाल्यावर रूग्णाच्या शरीरावर काय प्रभाव पडतो याबाबतही रिसर्च सुरू आहेत. अशातच आता एका ताज्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की,  कोविड-१९ रूग्णाकडून ९ दिवसांनंतर संक्रमण पसरत नाही. हा या व्हायरसबाबत केला गेलेला मोठा दावा मानला जात आहे.

यूकेतील काही वैज्ञानिकांनी ९८ रिसर्चच्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि त्या आधारावर ते या निष्कार्षावर पोहोचले. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार, जर कोविड-१९ रूग्णाच्या घशात, नाकात, विष्ठेत नऊ दिवसांनंतरही कोरोना व्हायरस आढळून आला आहे. पण तरी सुद्धा त्याने संक्रमण पसरत नाही. वैज्ञानिकांनी सार्स कोव-२ च्या ७९ रिसर्चसोबतच ८ सार्स कोव-१ आणि ११ मार्स कोव च्या रिसर्चचाही आपल्या अभ्यासात समावेश केला होता.

नंतर पसरत नाही संक्रमण

एका रिसर्चमधून सांगण्यात आले आहे की, व्हायरसचा जो जेनेटिक पदार्थ म्हणजे RNA घशात १७ ते ८३ दिवस राहतो. पण हा RNA स्वत: संक्रमण पसरवत नाही. प्रमुख वैज्ञानिक मुगे केविक आणि एंटोनियो हो यांनी PCR टेस्ट अशा जेनेटिक पदार्थाची ओळख पटवतं जे संक्रमण पसरवत नाही. पण संवेदनशीलतेच्या कारणाने त्याची ओळख पटते. तेच नऊ दिवसांनंतर व्हायरसचं कल्चर विकसित करण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात. वैज्ञानिकांनी सांगितले की, सार्स कोव-२ चा RNA जास्त काळ श्वसन तंत्र आणि विष्ठेत आढळतो. पण संक्रमणात सक्षम व्हायरस कमी वेळासाठीच राहू शकतो. 

संक्रमणाचा धोका कधी अधिक 

वैज्ञानिकांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आले आहे की, सार्स कोव-२ संक्रमित रूग्णात व्हायरल लोड तापाच्या पहिल्या आठवड्यात जास्त असतो. हे लक्षण दिसण्याआधी पहिल्या पाच दिवसात संक्रमण पसरण्याचा सर्वात जास्त धोका असतो. याचा अर्थ हा होतो की, रूग्णांची टेस्ट होईलपर्यंत त्यांचा संक्रमण पसरवण्याचा वेळ निघून गेलेला असतो.

वैज्ञानिकांचं मत आहे की, यातून हे स्पष्ट होतं की, रूग्णाला सुरूवातीच्या दिवसात आयसोलेट करणं किती महत्वाचं आहे. त्यासोबतच ज्या संक्रमित रूग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, ते सुद्धा सुरूवातीलाच संक्रमण जास्त पसरवू शकतात. या रिपोर्टचा एक असाही फायदा होऊ शकतो की, एखाद्या रूग्णाला जास्त काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज संपू शकते. याने दुसऱ्या रूग्णांवर उपचार लवकर होऊ शकतील आणि हॉस्पिटलवरही दबाव कमी येईल.

हे पण वाचा :

काळजी वाढली! कोरोनातून बरं झाल्यानंतर वर्षभरातच रुग्णांना उद्भवू शकते 'ही' समस्या

पावसाळ्यात सर्दी, खोकल्यापासून लांब राहण्यासाठी जेष्ठमधाचं सेवन ठरेल गुणकारी; वाचा आणखी फायदे

Web Title: Coronavirus : UK study says covid-19 patient cannot spread infection after 9 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.