Coronavirus test only in 100 rupees within few seconds software develops by iiit bhagalpur | आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन

आता काही सेकंदात फक्त १०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी ; IIT च्या तज्ज्ञांचे संशोधन

देशभरात कोरोनाच्या माहामारीने कहर केला आहे.  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी किट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी रॅपीड टेस्टींग करण्याची मागणी केली जात आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात कोरोनाची चाचणी करणं हे सुरूवातीला आवाहात्मक ठरत आहे.

या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी बिहारच्या भागपूरमधील ट्रिपल आयटी म्हणजेच इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी (IIIT) नवा अविष्कार तयार केला आहे. याद्वारे फक्त काही सेंकदात कोरोना रुग्णांची चाचणी करता येऊ शकते. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सुद्धा याचं कौतुक केले आहे. 

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आणि तज्ज्ञांनी एक्स रे आणि सिटी स्कॅनची इमेज पाहून व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे सांगणारं सॉफ्टवेअर तयार केलं आहे. जवळपास दोन महिन्यांआधी या सॉफ्टवेअरला आरोग्य मंत्रालयात मंजूरीसाठी निवेदन करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने  या सॉफ्टवेअरच्या  तपासणीची जबाबदारी आईसीएमआरकडे सोपावली आहे. आयसीएमआर कडून या सॉफ्टवेअरची पडताळणी झाल्यानंतर मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच अप्रुव्ह सर्टीफिकेट देण्यात येणार आहे.

सीटी स्कैैन(File Photo)

प्राध्यापक अरविंद यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाला एका रुग्णांची दोन वेळा तपासणी करावी लागते. त्यासाठी ५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे. खासगी लॅबमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे  मोजावे लागतात. तुलनेने या सॉफ्टवेअरवर १०० रुपये  खर्च केल्यानंतर कोरोना रुग्णांची दोनदा ते तीनदा तपासणी करण्यात येईल. या तपासणीतील रुग्णांचा रिपोर्ट अचूक येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.  

तसंच सॉफ्टवेअरमुळे टेस्टिंग किट नसतानाही चाचणी  करता येऊ शकते. या द्वारे कोरोना विषाणूंमुळे फुफ्फुसांचे होणारे नुकसान तसंच शरीरातील इतर भागातील कोरोनाचा प्रसार यांचे निदान करण्यासाठी मशीनची मदत होईल. या सॉफ्टवेअरच्या वापराने रुग्णांची तपासणी झाल्यास तात्काळ उपचार करणं शक्य होईल. 

...अन्यथा डोळे लाल होतील; इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी 'हा' करा उपाय

छातीत दुखणं हा असू शकतो कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा संकेत? WHO नं दिले स्पष्टीकरण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus test only in 100 rupees within few seconds software develops by iiit bhagalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.