मास्क लावल्यानंतरही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? तज्ज्ञांनी सांगितले यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 14:13 IST2020-06-17T14:00:03+5:302020-06-17T14:13:06+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्कचा वापर हत्याराप्रमाणे केला जात आहे.

मास्क लावल्यानंतरही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? तज्ज्ञांनी सांगितले यामागचं कारण
कोरोनाच्या माहामारीत संपूर्ण जगभरात मास्क, फेसशिल्डचा वापर करण्यावर जोर दिला जात आहे. मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणं लोकांच्या जीवनशैलीचा भाग ठरला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्कचा वापर हत्याराप्रमाणे केला जात आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आले की, मास्क लावल्यानंतरही ३ फुटांपर्यंत कोरोना विषाणूंचा शरीरात शिरकाव होऊ शकतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जर मास्क लावलेला व्यक्ती सतत शिंकत असेल तर मास्क वापरल्याचा काहीही उपयोग नाही.
सायप्रस युनिव्हर्सिटी ऑफ निकोसियाच्या तज्ज्ञांकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मास्क लावल्यानंतरही ६ फुटांचा अंतर ठेवण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. जगभरातील उद्योग आणि व्यावसाईक शासनाला सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मागणी करत असताना या संशोधनामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
या संशोधनातील लेखक दिमित्रिस डिकाकिस ने दिलेल्या माहितीनुसार फक्त मास्कचा वापर केल्याने माहामारीच्या संक्रमणाचा वेग कमी करता येऊ शकतो. हवेत असलेल्या विषाणूंच्या ड्रॉपलेट्समार्फत होत असलेल्या संक्रमणाची तीव्रता कमी करता येत असून संक्रमणाचा धोका पूर्णपणे नष्ट होत नाही. तरीही मास्क वापरल्यामुळे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी असते. म्हणून विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करायला हवा.
काही दिवसांपूर्वी WHO ने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जास्तवेळपर्यंत मास्क लावणं घातक ठरू शकते. कारण कार्बन डायऑक्साईडचा स्तर वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कार्बन डाइऑक्साइडमध्ये असणारे हाइपरकेनियामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, डोळ्यांना व्यवस्थित न दिसणं, कानांना ऐकू न येणं अशा समस्या उद्भवू शकतात.
चिंता वाढली! इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या पाचपैकी एका रुग्णाला कोरोना संक्रमणाचा धोका
कोरोनाचा फुफ्फुसांपेक्षा मेंदूला जास्त फटका; ३ दिवसात १० पटीने वाढते विषाणूंची संख्या