CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:04 AM2020-06-26T04:04:34+5:302020-06-26T04:04:50+5:30

म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे. हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.

CoronaVirus: Should I have separate health insurance for Corona? | CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

CoronaVirus: ‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

Next

- अमोल अन्नदाते
‘कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे. हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.
जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.
आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.
प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.
बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.
शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.
प्रत्येक विम्याचा काळ फक्त
१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus: Should I have separate health insurance for Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.