Coronavirus : कोरोनाला मात देण्यासाठी नवी रणनीति Serological Survey, वाचा काय आहे हा सर्व्हे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 14:31 IST2020-06-22T14:27:22+5:302020-06-22T14:31:24+5:30
आता हा सेरोलॉजिकल सर्व्हे काय आहे आणि याचा कोरोना व्हायरसवर काय प्रभाव पडेल हे जाणून घेऊ.

Coronavirus : कोरोनाला मात देण्यासाठी नवी रणनीति Serological Survey, वाचा काय आहे हा सर्व्हे...
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दुसरीकडे कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. भारतात अनलॉकनंतर तर रूग्णांची संख्या फार जास्त वाढली आहे. त्यात राजधानी दिल्लीमध्ये तर कोरोनाने हैदोस घातला आहे. अशात कोरोनाला रोखण्यासाठी सेरोलॉजिकल सर्व्हे केला जाणार आहे. आता हा सेरोलॉजिकल सर्व्हे काय आहे आणि याचा कोरोना व्हायरसवर काय प्रभाव पडेल हे जाणून घेऊ.
ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सेरोलॉजिकल सर्व्हेची सध्या चर्चा होत आहे. हा सर्व्हे कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी एक नवीन रणनीति ठरेल असं बोललं जात आहे.
The findings appeared in media related to ICMR Sero Survey for COVID-19 are speculative and survey results yet to be finalised. #IndiaFightsCorona@PIB_India@CovidIndiaSeva
— ICMR (@ICMRDELHI) June 9, 2020
काय आहे हा सर्व्हे?
देशातील वेगवेगळे राज्य, कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोना व्हायरस कोणत्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 11 मे रोजी सेरो सर्व्हेचा आदेश दिला. सर्व्हेनुसार, लोकांचे ब्लड सॅम्पल घेतले जात आहेत आणि हे जाणून घेतलं जात आहे की, किती लोकांच्या शरीरांमध्ये कोरोनासाठी अॅंटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
हा सर्व्हे ICMR च्या National Institute of Epidemiology (NIE) आणि National Institute for research in tuberculosis यांच्या संयुक्त विद्यमाने केला जात आहे. यात राज्यातील आरोग्य विभागांचीही मदत घेतली जात आहे.
काय आहे याची प्रोसेस?
ब्लड सॅम्पल घेण्यासाठी देशाला दोन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग असे राज्य आणि जिल्हे आहेत जिथे कोरोनाचे सर्वात जास्त रूग्ण आहेत. यात मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदोर, जयपूर आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये कोरोनाच्या केसेस झीरो, कमी, मीडियम आणि खूप जास्त आहेत.
दरम्यान दिल्लीमध्ये 27 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत सेरोलॉजिकल सर्व्हे केला जाईल. यादरम्यान साधारण 20 हजार लोकांचे सॅम्पल घेतले जातील. त्यासोबत कन्टेन्मेट झोन बाहेर त्या घरांची यादी लागेल जिथे कोरोना व्हायरसचा धोका आहे. जेणेकरून लोक सावध होतील.
CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर
खुशखबर! एकमात्र कोरोनाची लस यावर्षीच यशस्वीरित्या तयार होणार, भारतात उत्पादनाला सुरूवात