शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Coronavirus : कसं कराल डबल मास्किंग, काय आहे योग्य पद्धत? जाणून घ्या तज्ज्ञांकडून....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:18 IST

तज्ज्ञांकडून लोकांना सतत आवाहन केलं जात आहे की, घरातून बाहेर पडताना मास्क चांगल्या प्रकारे लावा. सध्या डबल मास्किंगवर जास्त जोर दिला जात आहे.

गेल्या काही दिवसात कोरोनाच्या केसेस कमी तर झाल्या पण अजूनही देशभरात दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्यांच्या आकडेवारीत चढउतार होत आहे. संक्रमण रोखण्यासाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत आणि तज्ज्ञांकडून लोकांना सतत आवाहन केलं जात आहे की, घरातून बाहेर पडताना मास्क चांगल्या प्रकारे लावा. सध्या डबल मास्किंगवर जास्त जोर दिला जात आहे. चला जाणून घेऊन कशाप्रकारे योग्य डबल मास्किंग करायचं.

डबल मास्किंगचा अर्थ होतो दोन मास्क लावणे. पण यातही काहींना असा प्रश्न पडतो की, कोणते दोन मास्क लावायचे. जेणेकरून संक्रमणापासून बचाव होईल. कारण मास्क तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे की, सर्जिकल मास्क, कॉटन मास्क, एन-९५ मास्क. (हे पण वाचा : Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून संक्रमणाचा धोका किती वेळ राहतो? AIIMS च्या रिपोर्टमधून खुलासा)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, डबल मास्किंग कसं करावं. याची योग्य पद्धत काय आहे? मंत्रालयाने सल्ला दिला आहे की, डबल मास्किंगसाठी आधी सर्जिकल मास्क लावावा आणि त्याच्यावर आणखी एका टाइट फिटिंग असलेल्या कपड्याचा मास्क लावावा.

सर्जिकल मास्क नसेल तर काय?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, जर तुमच्याकडे सर्जिकल मास्क नसेल तर एकत्र दोन कॉटन मास्क तुम्ही लावू शकता. बरेच लोक सर्जिकल मास्क वापरतात. लोक हा मास्क धुवून पुन्हा वापरतात. पण सरकारनुसार, सर्जिकल मास्क धुवून पुन्हा वापरू नये. कारण हा मास्क केवळ एक वेळ वापरण्यासाठी तयार केलेला असतो.

मंत्रालयाने सांगितलं की, सामान्यपणे सर्जिकल मास्कचा एकदाच वापर करावा. पण जर तुम्ही त्याला डबल मास्किंगसाठी वापरत असाल तर त्याचा तुम्ही पाच वेळाही वापर करू शकता. यााठी तुम्ही तो मास्क एकदा वापरून सात दिवसांसाठी उन्हात ठेवा. त्यानंतर तो मास्क तुम्ही पुन्हा डबल मास्किंगसाठी  वापरू शकता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य