व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 01:05 PM2020-06-11T13:05:28+5:302020-06-11T13:18:11+5:30

कोरोनासोबत जगत असताना बचाव करण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती चांगली असणं गरजेंच आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तरचं विषाणूंच्या संक्रमणाचा सामना करता येऊ शकतो. 

Coronavirus : Researcher claim vitamin k foods help fight covid 19 include these 10 vitamin k | व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय

व्हिटामीन 'के' ची कमतरता ठरू शकते कोरोनाच्या संक्रमणाचं कारण; वेळीच जाणून घ्या उपाय

Next

जगभरात कोरोनाच्या माहामारीचा प्रकोप वाढत चालला आहे. चीनच्या वुहान शहरातून परसलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत लाखों लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना व्हायरसवर आतापर्यंत कोणतेही औषधं किवा लस तयार करण्यात आलेली नाही. अनेक देशात लॉकडाऊन उठवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगत असताना बचाव करण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती चांगली असणं गरजेंच आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तरचं विषाणूंच्या संक्रमणाचा सामना करता येऊ शकतो. 

संशोधकांना व्हिटामीन के ची कमतरता आणि कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमध्ये संबंध दिसून आला आहे.  व्हिटामीन के कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नॅशनल पोस्टच्या माहितीनुसार कार्डीओवॅस्क्यूलर रिसर्च इंस्टिट्यूटच्या सहयोगाने १३४ लोकांवर परिक्षण करण्यात आले. ज्यांना  १२ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं.  हार्वर्डमधील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरात व्हिटामीन के योग्य प्रमाणात असल्यास रक्त गोठण्याच्या स्थितीला नियंत्रीत करण्यासाठी फायदेशीर ठरतं.  

कारण रक्ताच्या गुठळ्या झाल्यास त्यामुळे स्ट्रोक, हार्ट अटॅक असे जीवघेणे आजार उद्भवू शकतात. या समस्या कोरोना रुग्णांमध्ये दिसून आल्या आहेत. ताज्या भाज्या आणि फळांचा आहार घेतल्यास व्हिटामीन के ची कमतरता भासत नाही. यात व्हिटामीन k1 आणि k2  असे दोन प्रकार असतात.  ब्रोकोली, शतावरी, सोयाबीन, पालक या पदार्थांचे सेवन करून तुम्ही व्हिटामीन के ची  कमरता भरून काढू शकता.

पालक 

 पालकाचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन के , मिनरल्स आणि अल्फा लिपोइक एसीड पालकमध्ये आढळते. यामुळे शरिरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. याशिवाय कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचे आहे.

ब्रोकोली 

ब्रोकोली मधील पोषक घटक तुमच्या ह्रदयासाठी उपयुक्त असतात. नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमध्ये व्हिटामनी के सोबतच फायबर्स असतात. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश करायला हवा.

सोयाबीन

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. सोयाबीनमध्ये व्हिटामीन के असते.  आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमकुवतपासून आराम मिळतो. 

दिलासादायक! भारतातील बायोटेक फर्म तयार करणार कोरोनाची लस; अमेरिकेतील कंपनीसह हात मिळवणी

खुशखबर! तयार झालं कोरोना विषाणूंचे औषधं; कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या होणार कमी

Web Title: Coronavirus : Researcher claim vitamin k foods help fight covid 19 include these 10 vitamin k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.