खुशखबर! तयार झालं कोरोना विषाणूंचे औषधं; कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:00 AM2020-06-11T10:00:08+5:302020-06-11T10:17:54+5:30

CoronaVirus latest News : जे लोक आधीपासून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं. 

Coronavirus : coronavirus human trial singapore biotech firm to begin human clinical trial | खुशखबर! तयार झालं कोरोना विषाणूंचे औषधं; कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या होणार कमी

खुशखबर! तयार झालं कोरोना विषाणूंचे औषधं; कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या होणार कमी

Next

सिंगापूरची बायोटेक्नोलॉजी कंपनी Tychan द्वारे पुढच्या आठवड्यापासून  कोरोना विषाणूंच्या उपचारांसाठी मोनोक्लोनल एंटीबॉडीच्या चाचणीला सुरूवात होणार आहे. या चाचणीतून TYO27 कोरोना रुग्णांवर किती परिणाकारक ठरू शकतो याबाबत  माहिती मिळू शकेल. मोनोक्लोनल एंटीबॉडी किंवा इम्यून सिस्टीम प्रोटीन कोरोनाला नष्ट करण्यासाठी कार्य करतात. शरीरातील एंटीबॉडीजना इन्फेक्शनशी लढण्यासाठी तयार केले जाते.  तसंच मोनोक्लोनल बॉडीज शरीरात असलेल्या नैसर्गीक एंडीबॉडीज प्रमाणे काम करतात.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोणतीही अशी एंटीबॉडी उपलब्ध नाही. ज्याद्वारे कोरोना व्हायरसचा खात्मा केला जाऊ शकतो. न्यूज एशियाच्या रिपोर्टनुसार सिंगापूरची  Tychan ही पहिली कंपनी आहे. ज्या कंपनीद्वारे माणसांवर परिक्षण केले जाणार आहे. एंटीबाडी ट्रीटमेंट तयार करण्याासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयोगासाठी या कंपनीने नोंदणी सुद्धा केली आहे. 

व्हेंटिलेटरवरून रुग्णांना हलवण्यात येऊ शकतं. 

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर मेडिकल स्कूलच्या प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसास  या चाचणीचे परिणाम दिसून आल्यानंतर वापरासाठी विचार केला जाणार आहे. या औषधांची चाचणी यशस्वी झाल्यास कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी तसंच गंभीर आजारावरील उपचारासाठी वापर करण्यात येईल. याशिवाय श्वासांच्या संबंधीत समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. त्यांनी सांगितले की, ज्या लोकांना ऑक्सिजनची गरज भासते, त्यांना या औषधाने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार नाही. जे लोक आधीपासून व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं. 

जर कोरोना रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरलं तर कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांच्या संख्या कमी करता येऊ शकते.  तसंच हे औषध आरोग्य विभागात काम करत असेलल्या लोकांना देऊन इन्फेक्शनचा धोका कमी करता येऊ शकतो.  जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भारतात चार लसी चाचणीसाठी तयार आहेत. लवकरच माणसांवर परिक्षण होणार आहे. लसीची चाचणी वेगवेगळ्या ट्प्प्यात सुरू आहे. 

कोरोना व्हायरसच्या लसीबाबत भारतातील नोडल एजेंसी बायोटेक्नोलॉजी डिपार्टमेंटचे सचिन रेनू स्वरूप यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ४ लसी या महत्वाच्या टप्प्यात आहेत. ३ ते ६ महिन्याच्या आत क्लिनिकल ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. लसीची चाचणी सुरूवातीला लहान ग्रुपवर करण्यात येईल. त्यावरून लसी किती परिणामकारक आहे. याची माहिती मिळवता येऊ शकते. 

CoronaVirus :भाज्या आणि फळ घरी आणताना होऊ शकतो कोरोनाच संसर्ग; 'अशी' घ्या काळजी

काळजी वाढली! कोरोना विषाणू कोणत्या भागावर कितीवेळ जिवंत राहू शकतो?;संशोधनातून खुलासा

Web Title: Coronavirus : coronavirus human trial singapore biotech firm to begin human clinical trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.