काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 09:58 AM2020-07-26T09:58:31+5:302020-07-26T10:50:20+5:30

CoronaVirus News & Latest Udates : जे लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा लोकांना हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे.

CoronaVirus : Recovered from covid 19 people are facing these major disease | काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या

काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या

Next

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोविड 19 सामान्य फ्लूप्रमाणे नसून  माणसाच्या शरीराला पूर्णपणे आजारी बनवतो. कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. जे लोक कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर आले आहेत अशा लोकांना हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्यांचा  उद्भवत आहेत.

आरोग्य तज्ज्ञांनी काही महिने आधीच याबाबत कल्पना दिली होती. कारण संक्रमणापासून बचाव केल्यास या समस्याही टाळता येऊ शकतात.कोरोनातून बरं झाल्यानंतर लोकांच्या शरीरात कोणते नवीन आजार उद्भवतात याबाबत सांगता येत नाही. संक्रमण होते तेव्हा कोरोना श्वसन तंत्रावर आणि फुफ्फुसांना सगळ्यात जास्त नुकसान पोहोचवतो. पण या आजारातून बाहेर आल्यानंतर व्यक्तीला हृदय, किडनी, लिव्हर यांसंबंधी समस्या उद्भवतात. या आजारांपासून बचावासाठी वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोरोना संक्रमणातून जे लोक पूर्णपणे बरे झाले आहेत.

NBT

अशा लोकांना सामान्य ते गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. काही रुग्णांमध्ये कोणतंही कारण नसताना ५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी ताप येण्याची समस्या  उद्भवली. यात रुग्णांना खूप थकवा जाणवून अशक्तपणा वाटतो.  काही रुग्णांमध्ये अतिसार, उलट्या होणं या समस्या वारंवार उद्भवत होत्या. यामुळेच शरीरात अशक्तपणा येऊन अन्य आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते. 

कोविड १९ मधून बरं झाल्यानंतर रुग्णांना फुफ्फुसांची समस्या उद्भवते. फाइब्रॉयसिस (fibrosis) या आजारात लंग्स टिश्यू डॅमेज होतात. म्हणजेच फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी श्वास घ्यायला त्रास  होतो. कोरोनातून बाहेर आल्यानंतरही अशा रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असते. याशिवाय हृदयासंबंधी समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात. हृदयाच्या पेशींना सुज येण्याचं प्रमाण वाढलं आहे. वैद्यकिय परिभाषेत या समस्येला  मायोकाइडार्टिस (myocarditis) म्हणतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनातून बरं झाल्यानंतर उद्भवत असलेल्या आजारांपासून बचावासाठी चांगल्या, आनंदमय वातावरणात राहणं गरजेचं आहे. 

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

Web Title: CoronaVirus : Recovered from covid 19 people are facing these major disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.