शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अनेकदा सांगूनही लोक करत आहेत 'या' चुका, व्हायरसचे शिकार होण्याआधी सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 19:01 IST

कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना शासनाच्या आदेशाचे पालन करत असताना वैयक्तीक स्वच्छता बाळगणं सगळ्यात महत्वाचं आहे.

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. लोकांना वाचवण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना शासनाच्या आदेशाचे पालन करत असताना वैयक्तीक स्वच्छता बाळगणं सगळ्यात महत्वाचं आहे. वारंवार सांगूनही लोक काही चुका करत आहेत. त्यामुळे व्हायरसचं इन्फेक्शन होऊन जीवाला धोका उद्भवू शकतो. आज आम्ही तुम्हाला या सवयींबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकता. 

बुट-चपला धुणं

जर तुम्ही कोणत्याही कारणासाठी बाहेर जात असाल तर घरात प्रवेश केल्यानंतर गरम पाण्याने आपल्या चपला धुवायला हव्यात. कारण बाहेरून येताना चपलेसोबत  व्हायरसचं इन्फेक्शन घरी आणण्याचा धोका असतो. त्यामुळे साबणाच्या पाण्यात बूडवून आपल्या चपला- बुट स्वच्छ करा.

कपडे

तुम्ही फक्त काही वेळासाठी बाहेर पडत असाल तरी, घरी आल्यानंतर आपले कपडे धुवायला टाका. तसंच रोजच्या रोज धुतलेले कपडे घाला. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोणताही व्हायरस हा कपड्यांवर दीर्घकाळ टिकून राहू शकतो. म्हणून तुमच्या कुटुंबियांना इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी कपडे स्वच्छ ठेवा.

दुधाची पिशवी धुणं

दुधाची पिशवी घरोघरी रोज आणली जाते.  फॅक्टरीमधून निघाल्यानंतर तुमच्या घरी येईपर्यंत अनेकांचे हात दुधाच्या पिशवीला लागलेले असतात. त्याासाठी दुधाची पिशवी घरी आणून धुवून घ्या.

फळं भाज्या

बाहेरून फळं भाज्या आणल्यानंतर गरम पाण्याने धुवून मगच फ्रिजमध्ये ठेवा.  जेवण बनवण्याच्या आधी आणि बनवून झाल्यानंतर दोन्हीवेळा हात स्वच्छ धुवा. आणलेल्या भाज्या एका भांड्यातील पाण्यात ओताव्या. पिशवी घरात न ठेवता घराबाहेर न ठेवता घराबाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी. पालेभाज्या कोमट पाण्यात काही वेळ पूर्ण बुडवून ठेवाव्या व फळभाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.

बाहेर सामान आणायला जाताना कापडी पिशवीचा वापर  करा. बाहेरून आल्यानंतर ही पिशवी सुद्धा स्वच्छ धुवून सुकवून मगच वापरा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स