CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’ : कोरोना तपासणीचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:30 AM2020-05-20T00:30:55+5:302020-05-20T00:31:22+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुढील निर्देशात श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे याचा अर्थ १००.४ डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त ताप आणि खोकला असा आहे.

CoronaVirus News : Understand ‘Corona’: New criteria for corona testing | CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’ : कोरोना तपासणीचे नवे निकष

CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’ : कोरोना तपासणीचे नवे निकष

Next

नुकतेच आयसीएमआर या कोरोनाविषयी तपासणी व उपचाराचे वैद्यकीय धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थेने कोणाची कोरोना तपासणी करायला हवी याचे नवे निकष जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पुढील व्यक्तींची आता कोरोना तपासणी करावी असे आयसीएमआरचे निर्देश आहेत.
पुढील निर्देशात श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे याचा अर्थ १००.४ डिग्री फॅरनहाईटपेक्षा जास्त ताप आणि खोकला असा आहे.
- गेल्या १४ दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास झाला असून, अशा व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- निदान निश्चित झालेल्या केसच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- कंटेन्मेंट भागात व कोरोना संदर्भात कार्यरत असलेले सर्व कुठल्याही व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- सारी म्हणजे ताप, खोकला,
श्वास घेण्यास त्रास
- निदान निश्चित झालेल्या केसच्या थेट संपर्कात आलेली लक्षण विरहित आलेली आणि जोखीम वाढवणारे घटक (६० पेक्षा जास्त वय, ६० च्या खाली वय व इतर मोठे आजार ) असल्यास त्यांची संपर्क आल्यापासून पाचव्या ते चौैदाव्या दिवसापर्यंत तपासणी करणे
- हॉटस्पॉट व कन्टेन्मेंट झोनमध्ये कुठल्याही व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- रुग्णालयात दाखल असलेल्या कुठल्याही रुग्णाला
श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- स्थलांतरितांमध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
- कुठलीही प्रोसिजर किंवा शस्त्रक्रिया करत असताना वरील कुठल्या ही निकषांमध्ये रुग्ण
बसत असल्यास तपासणी करून प्रोसिजर करावी.
- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus News : Understand ‘Corona’: New criteria for corona testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.