शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

खुशखबर! ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार

By manali.bagul | Published: September 22, 2020 12:37 PM

Corona Vaccine News & latest Updates : आतापर्यंत जगभरातील कोणत्याही देशात लस यशस्वीरित्या तयार झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यासाठी आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी फायजर कंपनीची कोरोनाची लस चाचणी प्रक्रियेतून यशस्वी होऊन सगळ्यात आधी लोकांसाठी उपलब्ध होईल असे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूजशी बोलताना मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, फायजर कंपनीच्या लसीचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. जॉनसन एंड जॉनसनची लस येण्याासाठी  विलंब होऊ शकतो असं ही ते यावेळी म्हणाले. आतापर्यंत जगभरातील कोणत्याही देशात लस यशस्वीरित्या तयार झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यासाठी आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. 

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. मधल्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव या लसीची चाचणी रोखण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा या लसीची चाचणी सुरू करण्याची परवानगी मिळाली. यादरम्यान फायजर कंपनीच्या लसीचे चांगले परिणाम दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले  होते. की, संकटांचा सामना करत असलेल्या अमेरिकन लोकांसाठी डिसेंबरपर्यंत लस तयार होऊ शकते. सगळ्यात आधी वयस्कर लोक आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे.

अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसीनं एक  गाईडलाईन जारी केली आहे. सीडीसीनं अमेरिकन राज्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारीपर्यंत  लसीकरण करण्यासाठी तयार असायला हवं. ही लसीकरण मोहिम मोफत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.  अमेरिकेचे  तज्ज्ञ डॉ. एथंनी फाऊची यांच्यासह अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षाच्या शेवटापर्यंत अमेरिकेत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल पण याची शक्यता कमी आहे. ट्रम्प हे अमेरिकेत ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांच्या आधी लस लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यावेगाने कोणतीही लस यशस्वी होताना दिसून येत नाहीये.

लस तयार होण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो?

पहिला टप्पा : रिसर्च अँड डेव्हलपमेंट

या प्रक्रियमध्ये दोन ते चार वर्षांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनावरील लसीच्या या प्रक्रियेत जलद काम सुरु आहे. यामागील कारण असे आहे की, चीन सरकारला जानेवारीत विषाणूचा जेनेटिक सिक्वेंस आढळला होता. त्यावेळी कोरोना विषाणू फक्त चीनमध्ये होता. जास्तकरून लस ही विषाणूच्या प्रोटीनऐवजी त्यांच्या जेनेटिक स्विक्वेंसच्या आधावर असते.

दुसरा टप्पा : प्री-क्लिनिकल

रिसर्च आणि डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर, या लसीची चाचणी प्राणी आणि झाडांवर केली जाते. यामध्ये त्यांची क्षमता आणि कामकाज यांचे विश्लेषण केले जाते. यावेळी लस दिल्यानंतर प्राणी आणि झाडांची प्रतिकार शक्ती वाढते की नाही, हे संशोधक पाहणी करतात. जर लसीचा प्रभाव झाला नाही, तर पुन्हा लसीची चाचणी पहिल्या टप्प्यावर जाते, त्यामुळे प्रक्रिया पुन्हा लांबते.

तिसरा टप्पा : क्लिनिकल ट्रायल

लस तयार करण्याचा हा सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा असतो. कारण, लसीच्या क्षमतेची चाचणी मानवावर केली जाते. या टप्प्यात 90 महिन्यांपर्यंत किंवा सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी घेण्याची क्षमता ठेवली आहे. या टप्प्यात सुद्धा आणखी तीन टप्पे असतात. यात बरेच असे उमेदवार आहेत, जे दुसऱ्या टप्प्यात यशस्वी होतात. परंतु तिसऱ्या टप्प्यात अपयशी ठरतात. 1) या लसीचा उपयोग लोकांच्या लहान समुहावर केला जातो आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत की नाही याची तपासणी केली जाते. याला सुमारे तीन महिने लागू शकतात.2) ज्या लोकांना लस द्यावयाची आहे, त्यांची संख्या हजारोपर्यंत वाढविली जाते. यासाठी सरासरी 6 ते 8 महिने लागू शकतात. यामध्ये रोगाची प्रतिकारशक्ती (इम्यून रिस्पॉन्स) विकसित झाली की नाही हे पाहिले जाते. यावेळी लसीच्या सामान्य आणि उलट प्रतिक्रिया निर्माण होण्याच्या क्षमतेचे देखील विश्लेषण केले जाते. कोरोना विषाणूच्या बाबतीत हा टप्पा छोटा करण्यात आला आहे, कारण काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारे बरेच उमेदवार आता क्लिनिकल ट्रायल टप्प्यात पोहोचले आहेत.3) हजारो लोकांवर लसीचे मूल्यांकन  केले जाते आणि जास्त लोकांमध्ये ही लस कशी कार्य करते, हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पुन्हा 6 ते 8 महिने लागू शकतात.

चौथा टप्पा : रेग्युलेटरी रिव्यू (नियामक पुनरावलोकन)

मानवी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वी झाल्यानंतर लस निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत जाण्यापूर्वी नियामक समर्थनाची आवश्यकता असते. सामान्यत: याला बराच वेळ लागतो, परंतु अशा सार्वजनिक आपत्कालीन परिस्थितीत, कालावधी कमी केला जाऊ शकतो.

पाचवा टप्पा : मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी कंट्रोल (उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण)

या टप्प्यात, लस तयार करणार्‍या कंपनीला चांगल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक संसाधनांची आवश्यकता असते, जेणेकरुन लस तयार करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू केली जाऊ शकेल.

रोगावर मात करण्यासाठी लसच का?

लस हे एक प्रकारचे औषध आहे, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि विषाणूशी लढायला मदत करते. रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा एक मार्ग म्हणजे लस. कोणताही रोग टाळण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे. ही लस रोगप्रतिकारक यंत्रणेस उत्तेजित करते व अँटिबॉडीज तयार करते. बहुतेक लस इंजेक्शनद्वारे दिल्या जातात, परंतु काही तोंडी किंवा नाकाद्वारे देखील दिली जातात. आतापर्यंत पोलिओ, टिटॅनस, डिप्थीरिया, मेनिंजायटीस, इन्फ्लूएन्झा, टाइफाइड अशा 25 हून अधिक जीवघेण्या रोगांपासून वाचविण्यासाठी लस दिली जाते.

हे पण वाचा-

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प