CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक; फक्त या मार्गांनी संसर्गापासून राहाल लांब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:00 PM2021-03-29T13:00:07+5:302021-03-29T13:06:00+5:30

CoronaVirus News & latest Updates : लोक कोरोना नियमांचं पालन करत नाही त्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.

CoronaVirus News : Second wave of coronavirus in mharashtra what to do and do not | CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक; फक्त या मार्गांनी संसर्गापासून राहाल लांब

CoronaVirus News : चिंताजनक! राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक; फक्त या मार्गांनी संसर्गापासून राहाल लांब

googlenewsNext

कोरोना व्हायरसने (CoronaVirus)  गेल्या वर्षापासून जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मागच्या वर्षीप्रमाणे स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. लोकांच्या मनात लॉकडाऊनची भीती असून दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, यासह इतर राज्यात कोरोनानं कहर केल्यामुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.  दरम्यान लोक कोरोना नियमांचं पालन करत नाही त्यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही काय करायला  हवं आणि काय टाळायचं हे आधी जाणून घ्या.

१) बाहेरून घरात आल्यानंतर गरम पाणी प्या. याशिवाय  गरम पाण्याची बाटली बाहेर जाताना सोबत ठेवा. सार्वजनिक स्थळी, प्रवासादरम्यान व्हायरसचा संसर्ग झाला असेल तर  गरम पाण्याच्या सेवनाने त्याचा प्रभाव फारकाळ टिकू शकणार नाही. 

२) दिवसभरात शरीराला पाण्याची जितकी आवश्यकता असते. तितक्या पाण्याचे सेवन करायलाच हवं. योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन करून तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवाल तर व्हायरस फारकाळ टिकू शकणार नाही. वैयक्तिक स्वच्छतेला महत्व द्यायला हवं. किमान 20 सेकंद स्वतःचे हात साबण किंवा हँडवॉशने स्वच्छ करा.

३) व्हायरसनं शरीरात प्रवेश केल्यानंतर काही लक्षणं दिसायला सुरूवात होते. कोरोनाची लक्षणं सौम्य दिसत असतील. घरगुती उपाय केल्यानं किंवा खबरदारी बाळगल्याने आजारांपासून लांब राहता येऊ शकतं. फुफ्फुसांमध्ये सूज येणं.  घसा खवखवणं, खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशा शारीरिक समस्या निर्माण होतात. गरम पाणी,  वाफ  घेणं, हळदीच्या दुधाचं सेवन करणं असे उपाय करून तुम्हाला व्हायरसच्या संक्रमणापासून लांब राहता येऊ शकतं.

 सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या'  ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार

४) शिंकताना,खोकताना तोंडावर टिश्यू पेपर किंवा रूमाल धरा. यापैकी काहीच नसेल तर आपल्या हाताचं कोपराजवळील भाग तोंडाजवळ न्या.  मॉल, जीम, रेस्टॉरंट,  जिथं सोशल डिस्टन्सिंग राखणं शक्य नाही तिथं जाऊ नका.

५) मास्क, ग्लोव्ह्ज यांचा वापर करून झाल्यावर त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा. रोज एकच मास्क वापरू नका. वॉशेबल मास्क असल्यास उत्तम ठरेल. 

चिंताजनक! 'या' वयोगटातील लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढतोय कोरोना संसर्गाचा धोका; तज्ज्ञ सांगतात की....

६) जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर घरीच राहा. ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा चाचणी करून घ्या. बाहेर असताना चेहरा विशेषतः डोळे, नाक आणि तोंड यांना वारंवार स्पर्श करणं टाळा तसंच अनावश्यक प्रवास करणं टाळा.

७) मास्क घालणं गरजेचंच आहे पण मास्कचा डोळ्यांवर पडणारा प्रभाव नियंत्रणात ठेवला पाहिजे. तुम्ही तासनतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही.

८) मास्कमुळे डोळ्यांखालचा भाग ताणला तर जात नाही ना हे पाहा. शक्य असेल तर मोकळ्या हवेत जाऊन मास्क खाली काढून श्वास घ्या. डोळ्यात जळजळ, खाज अशी लक्षणं सतत जाणवत राहिल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: CoronaVirus News : Second wave of coronavirus in mharashtra what to do and do not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.