CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या इमारतींमुळे लोकांना 'या' आाजारांचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:20 PM2020-05-04T13:20:49+5:302020-05-04T13:23:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊननंतर बंद असलेली ठिकाणं पुन्हा सुरू झाल्यानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

CoronaVirus News Marathi : After lockdown end water system of buildings may create problems myb | CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या इमारतींमुळे लोकांना 'या' आाजारांचा असू शकतो धोका

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या इमारतींमुळे लोकांना 'या' आाजारांचा असू शकतो धोका

googlenewsNext

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे जगभरातून २ लाखापेंक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी  सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत.  अशात  कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यात परिणामकारक ठरणाराा उपाय म्हणजे लॉकडाऊन. पण लॉकडाऊननंतर बंद असलेली ठिकाणं पुन्हा सुरू झाल्यानंतर गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

कॉलेज, मॉल, जिम, हॉटेल्स, शाळा अशी सार्वजनिक ठिकाणं बंद आहेत. बंद  इमारतीमधील पाण्याच्या पाइपमध्ये भरपूर दिवसांपासून असलेल्या पाण्यात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. तज्ञांकडून लॉकडाऊनदरम्यान बंद असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर रिसर्च सुरू आहे. त्याचा सुरक्षितपणे पुनर्वापर कसा होईल, हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

तज्ञांनी अमेरिकेत अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या परड्यु युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील इमारतींमधील पाण्याचे सॅम्पल्स घेतले. बंद असलेल्या या इमारतीतल्या पाण्यात किटाणूनाशक नसल्याचं दिसून आलं.  या इमारतीतल्या पाण्यात सूक्ष्मजीवांमध्ये पुढील काही महिन्यांत काय बदल होतात, हे पाहण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा सुरू आहे.

परड्यु युनिव्हर्सिटीतील पर्यावरण इंजीनिअर एंड्रयू वेलटन यांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या इमारतींबाबत लोकांमध्ये जास्त जागरूकता नाही कारण याबाबत काही मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही. वेल्टीन आणि त्यांच्यासह काम करणाऱ्या इंजिनीअर कॅटलिन प्रॉक्टर यांचे यावर अधिक काम सुरू आहे. एखादी इमारत जितके जास्त दिवस बंद असते तितके जास्त दिवस तिच्यात बॅक्टेरियांची वाढ होऊन नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते.

वॉटर ट्रिटमेंट आणि त्यानंतर पाण्याचा वापर यामध्ये मोठा  कालावधी गेल्याने पाण्यात बॅक्टेरियांची पैदास होऊ शकते. शास्त्रज्ञांनी लीजोनेला या विशेष प्रकारच्या बॅक्टेरियाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे बॅक्टेरिया लीजोनायर्स हा आजार पसरवतात. हा आजार पाण्यामार्फत पसरतो. त्यामुळे व्यक्तीच्या श्वास घेण्याच्या क्रियेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

कोरोनाचा प्रसार होत असताना  हा आजार सुद्धा लोकांना आपलं शिकार बनवू शकतो. यावर उपाय म्हणून जर बंद नळांमधून काहीप्रमाणात पाणी वाहून जाऊ दिलं तर संकट टाळता येऊ शकतं. असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. (हे पण वाचा-घरी बसून शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढलंय का? 'या' लक्षणांनी ओळखा)

Web Title: CoronaVirus News Marathi : After lockdown end water system of buildings may create problems myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.