आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर कितपत होतोय कोरोनापासून बचाव? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:00 PM2020-11-04T12:00:43+5:302020-11-04T12:12:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : बाह्यसंसर्ग शोधण्याच्या या कामात सायटोकाईनमुळे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. शरीराचं तापमान वाढू शकतं.

CoronaVirus News & Latest Updates : Can our immune syestem protect us from coronavirus | आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर कितपत होतोय कोरोनापासून बचाव? जाणून घ्या

आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर कितपत होतोय कोरोनापासून बचाव? जाणून घ्या

Next

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोन व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.  जगभरातील लोक कोरोनाच्या लसीच्या प्रतिक्षेत आहेत. देशभरात ८० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. कोरोना व्हायरस हा  नाक, तोंड, डोळे, याद्वारे शरीरात प्रवेश करतो. श्वसननलिकेतून तो फुफ्फुसांकडे जाणाऱ्या खालच्या श्वसनमार्गात पोहोचतो.

या व्हायरसचे स्पाइक प्रोटिन एपिथेलियल सेलमध्ये अडकतात. या कालावधीत  कोणताही मागमूस जाणवत नाही. हा इन्क्युबेशन पीरियड असतो.  नंतर हळूहळू तो पेशींची कार्ययंत्रणा काबीज करतो आणि त्यांची जागा घ्यायला लागतो. रेप्लिकेशनने  व्हायरसची वाढ होत राहते आणि  व्हायरस शेजारच्या पेशींवर हल्ला करून  संक्रमण वेगाने पसरते. 

शरीरावर झालेल्या बाह्यहल्ल्यांना तोंड देण्याचं काम करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरात स्वत:ची एक प्रतिरोध यंत्रणा असते. यामुळे शरीरातील अँटिबॉडीज झपाट्याने  वाढवतात. मात्र काही वेळा ही रोगप्रतिकारक प्रणाली अतिक्रियाशील होते. संसर्गाशी लढा देणाऱ्या शरीरासाठी ती घातक ठरते. त्याचे अनेक साईड इफेक्ट्स दिसून येतात.  केमोकाइन्स हे  प्रोटिन संसर्ग झालेल्या ठिकाणी एकत्र येण्याचा संदेश रक्तातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना देतात. परिणामी शरीरात विशिष्ट रसायनांची निर्मिती होते आणि बाह्यसंसर्गाशी लढा दिला जातो. इम्युन सेल्सचा प्रकार असलेल्या न्यूट्रोफिल्सला मार्गदर्शन करण्याचं काम असंच सायटोकाईन नावाचं रसायन करत असते.

बाह्यसंसर्ग शोधण्याच्या या कामात सायटोकाईनमुळे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. शरीराचं तापमान वाढू शकतं. व्हायरसचा नाश करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सायटोकाईनमुळे संवादपेशी न्यूरॉन्सद्वारे मेंदूमधून तापमान आणि इतर शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवलं जातं. सायटोकाईनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यात शरीर प्रभावी ठरत नाही तेव्हा त्याला सायटोकाईन स्टॉर्म असं संबोधलं जातं. सायटोकाईनच्या अतिरिक्त निर्मितीमुळे काही वेळा अवयव निकामी होण्याची शक्यता असते. सायटोकिन स्टॉर्ममुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होते, अस द प्रिंटमधील बातमीत असा उल्लेख केला आहे.

'या' कारणामुळे मोठ्यांसह लहान मुलांनाही उद्भवतोय अस्थमा; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आलं की, जून ते सप्टेंबर काळात अँटिबॉडीजची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या लोकांचं प्रमाण 26 टक्क्यांनी घसरले होतं. एका नविन संशोधनातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली होती. कोरोनाने संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या अँटीबॉडीजमध्ये झपाट्यानं घसरण झाली होती. तीन महिन्यांच्या काळातच अँटिबॉडीज चाचणी झालेल्यांचं प्रमाण घटलं, असं संशोधक हेलेन वॉर्ड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले होते. कोरोनाचं नवं रूप ठरतंय घातक; ८५ टक्के रुग्णांमध्ये नवीन व्हायरस स्ट्रेनचा प्रसार, तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus News & Latest Updates : Can our immune syestem protect us from coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.