CoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:33 PM2020-05-29T15:33:45+5:302020-05-29T15:35:04+5:30

ताण कमी असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगल्या प्रकारे आपलं कार्य करू शकते.

CoronaVirus News : Know about Lockdown's effect on the immune system myb | CoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं

CoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशातील लोक आपापल्या घरांमध्ये कैद आहेत. लॉकडाऊनमुळे लोक फक्त गरजेच्या वस्तू घेण्यासाठीच घराबाहरे पडत आहेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबवता येऊ शकतो. पण घरी राहिल्यामुळे कोरोनापासून बचाव होत असला तरी अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. 

बॅक्टेरिया आणि व्हायरस

आपल्या शरीरातील सिर्केडियन क्लॉकमुळे शरीरात सुर्यापाासून मिळणारा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यात ताळमेळ टिकून राहतो. सुर्याच्या  किरणांपासून आपल्याला व्हिटामीन डी मिळतं. व्हिटामीन डी हे  दातांना आणि हाडांना मजबूती  देण्यासाठी फायदेशीर ठरतं. व्हिटामीन डी आपल्या फुफ्फुसांची रोगांची लढण्याची क्षमता अधिक चांगली बनवतो. 

संक्रमण झाल्यानंतर फुफ्फुसांच्या आतील भागात पेप्टईड्स बाहेर येतात. जे बॅक्टेरिया आणि व्हायरसला नष्ट करत असतात. या पेप्टाईड्सना कॅथेलिसिडिन असं म्हणतात. जे बी आणि टी सेल्सना मजबूती देण्याचं काम करतात. ज्या  लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता असते. त्यांना श्वसन नलिकेत व्हायरसचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

डब्लिन के ट्रिनिटी कॉलेजचे संशोधक रोज केनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटली आणि स्पेनमध्ये कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या लोकांमध्ये व्हिटामीन डी ची कमतरता दिसून आली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिटामीन डी च्या सप्लिमेंटस घेण्यापेक्षा कोवळे ऊन अंगावर घेतल्यास आजारांपासून वाचता येऊ शकतं. त्यामुळे इन्फुएंजा, व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो. 

लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे पुरेशी शारीरिक हालचाल होत नाही. पण त्यामुळे काही प्रमाणात धावपळ कमी झाल्याने ताण-तणाव कमी झाला आहे.  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीची क्षमता वाढत आहे.  कारण ताण कमी असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगल्या प्रकारे आपलं कार्य करू शकते. याशिवाय घरी राहिल्यामुळे एकटेपणा येत आहे. मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. 

सतत घरी राहिल्यामुळे  झोपेवर सुद्धा परिणाम होत आहे.  बाहेरच्या वातावरणात फिरल्यानंतर शरीराची थोडीफार हालचाल होते. त्यामुळे झोप चांगली लागते. पण लॉकडाऊन असाच पुढे वाढत राहीला तर काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून दिवसातून एकदातरी बाहेर पडायलाच हवं. अन्यथा शरीरावर वाईट परिणाम दिसून येईल.

कोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन? समजून घ्या 'या' गोष्टी

पुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

Web Title: CoronaVirus News : Know about Lockdown's effect on the immune system myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.